चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला आत्‍महत्‍येस प्रवृत्त केले, पतीला अटक, न्यायनगरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पत्नीला आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी पतीला अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अमोल माणिकराव साळवे (रा. न्यायनगर, छत्रपती संभाजीनगर) असे पतीचे नाव आहे. तो चारित्र्यावर संशय घेऊन दारूच्या नशेत पत्नीला सतत मारहाण करायचा, असा आरोप आहे.

ज्योती अमोल साळवे (वय २९, रा. न्यायनगर) असे आत्‍महत्‍या केलेल्या पत्नीचे नाव आहे. ज्योतीने १६ जानेवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांचे वडील सोमीनाथ भीमराव शिरसाठ (रा. शिरसगाव, ता. भोकरदन, जि. जालना) यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात ज्योतीच्या पतीविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीनुसार, ज्योती आणि अमोलचा विवाह २०१६ मध्ये झाला. त्यांना दोन मुले आहेत. सहा वर्षांपासून अमोल दारू पिऊन चारित्र्यावर संशय घेऊन ज्योतीला शिवीगाळ आणि मारहाण करत होता. त्रासाला कंटाळून ज्योती माहेरी निघून यायची.

त्यानंतर तो त्रास देणार नाही, असे सांगून पत्नीला परत घेऊन जायचा. नंतर पुन्हा त्रास देणे सुरू करायचा. १६ जानेवारीला ज्योतीने गळफास घेतल्याने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. १७ जानेवारीला ज्योतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील कन्हाळे करत आहेत. आई जग सोडून गेली, वडिलांना अटक झाली, त्यामुळे या दाम्‍पत्‍याच्या चिमुकल्या २ आणि ४ वर्षांच्या मुलांचा सांभाळ आता नातेवाइकांना करावा लागणार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software