हैवानीयत... ती पलंगावर झोपलेली पाहून नानासाहेबचा शारीरिक संबंधाचा प्रयत्न, तिच्या विरोधामुळे झटापट, विळ्याने गळा चिरून काढला पळ... त्या दिवशी मुरमीत काय घडलं...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुरमी येथील वैष्णवी संतोष निळ (वय १७) या कॉलेज तरुणीची हत्या करणारा क्रूरकर्मा नानासाहेब कडूबा मोरे (वय २७, रा. मुरमी) याची हैवानीयत तपासात समोर आली आहे. पोलीस कोठडीत पोलिसांनी त्याला खाक्या दाखवला, त्यावेळी त्याने गुन्ह्याचा घटनाक्रम सांगितला. गुन्हा करताना त्याच्यात अक्षरशः राक्षस शिरला होता. वैष्णवी पलंगावर झोपलेली असताना तो घरात शिरला. तिच्यासोबत शारीरिक संबंधाचा प्रयत्न केला. तिने जोरदार विरोध केला. दोघांत झटापट सुरू झाली. नानासाहेबने जवळच पडलेला विळा उचलला आणि तिचा गळा चिरला आणि पसार झाला...

नानासाहेब हा वैष्णवीला विवाहित असूनही मैत्रीची गळ घालत होता. ती त्याला नकार देत असल्याने दोघांत वाद होऊ लागले. त्याचा संताप वारंवार उफाळून येत होता. शुक्रवारी (१९ डिसेंबर) दुपारी वैष्णवी घरात एकटीच पलंगावर झोपलेली होती. नानासाहेब गुपचूप घरात शिरला. त्याने तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र वैष्णवीने विरोध केला. त्‍यामुळे नानासाहेबचा संताप अनावर झाला. त्याने पुन्हा जबरदस्तीचा प्रयत्न केला असता दोघांत जोरदार झटापट झाली.

नानासाहेबने तिचे तोंड दाबून मारहाण केली. त्यानंतर घरात असलेला भाज्या चिरण्याचा विळा उचलून तिचा गळा चिरून निर्घृण हत्या केली. वैष्णवी तडफडत त्याच्यासमोरच गतप्राण झाली. त्यानंतर नानासाहेबने पळ काढला. पळून जाताना खुनासाठी वापरलेला विळा सावळीराम पारधे यांच्या शेतातील विहिरीत फेकून दिले. पोलिसांनी रविवारी (२१ डिसेंबर) सकाळी विहिरीतून विळा बाहेर काढून जप्त केला आहे. या वेळी पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे, रमेश राठोड, सचिन राजपूत, पोलीस अंमलदार विजय पिंपळे, नितीन धुळे यांच्यासह पोलिस पथक उपस्थित होते.

घटनेची पार्श्वभूमी...
वैष्णवी वाळूजच्या साईनाथ महाविद्यालयात १२ वीत शिकत होती. ती रोज सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत कॉलेजला जात होती. ती वडील,आई, आजोबा आणि लहान भावासह राहण्यास होती. तिचे आई-वडील बटाईने शेती करतात. वडील पानटपरीसुद्धा चालवितात. शुक्रवारी नेहमीप्रमाणे सकाळी साडेसहाला ती कॉलेजसाठी घराबाहेर पडली. दुपारी महाविद्यालयातून वैष्णवी घरी आल्यानंतर एकटीच होती. तिचे वडील संतोष त्यांच्या पानपटरीवर गेले होते. लहान भाऊ शाळेत गेला होता. आई मथुरा बटाईने केलेल्या मुरमी येथील शेतात कामाला गेली होती. दुपारी तिच्या वडिलांना वैष्णवी खाटेजवळ उजव्या कुशीवर रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेली दिसली. त्यांनी लगेचच पत्नीला कॉल करून शेतातून बोलावून घेतले. गावातील लोकांनी पोलिसांना कॉल केल्याने ते लगेचच घटनास्‍थळी धावले. बोलेगाव (ता. गंगापूर) येथून नानासाहेबला २० डिसेंबरला पहाटे साडेतीनला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कसून चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला होता. मात्र खून का केला, हे सांगत नव्हता. वासनेने पेटलेल्या नानासाहेबने वैष्णवीचा घात केल्याचे समोर आले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश

Latest News

लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लाचखोर तत्कालीन पोलीस अंमलदार यमाजी लक्ष्मण खटाणे (रा. रेणुकानगर, गारखेडा परिसर) याला शुक्रवारी (६...
८० वर्षांच्या वृद्धेवर ५४ वर्षांच्या पुरुषाचा लैंगिक अत्याचार, सोयगावची खळबळजनक घटना
Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
Update : तलावात पोहत असताना दोन मुलांचा बुडून मृत्‍यू, हर्सूल सावंगीजवळील नायगावची दुर्दैवी घटना, दोन्ही मुले बायजीपुऱ्याचे!
धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software