‘सैराट’स्टाइल... बहिणीच्या प्रियकरावर चाकूचे सपासप वार!; दौलताबादजवळील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : प्लॉट, घर बघण्याच्या निमित्ताने बहिणीच्या प्रियकराला बोलावून घेतले. नंतर प्लॉटही बघितला. घर बघायला जात असताना लघुशंकेच्या बहाण्याने गाडी थांबवून बहिणीच्या प्रियकरावर तरुणाने सपासप चाकूने वार केले. यात प्रियकर गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा थरार दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत शरणापूर फाट्याजवळ रविवारी (२१ डिसेंबर) दुपारी तीनच्या सुमारास घडली.

जखमी तरुणाचा जबाब दौलताबाद पोलिसांनी घाटी रुग्णालयात येऊन नोंदवला. जबाबानुसार, त्याचे आई-वडील शेती करतात. तो २०२३ मध्ये वाळूज एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कामाला होता. त्याच कंपनीत कामाला असणाऱ्या वाळूज एमआयडीसी परिसरातील कमळापूरच्या मुलीसोबत त्याची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर तरुणाला दुसऱ्या कंपनीत काम भेटल्याने तो तिथे कामाला जाऊ लागला. त्याची आणि मुलीची भेट अधूनमधून होत होती. ६ नोव्‍हेंबरला मुलीने प्रेमाबद्दल घरी सांगितले. त्याच दिवशी तिच्या वडिलांनी मुलाच्या वडिलांना कॉल करून दोघांबद्दल विचारपूस केली.

त्यानंतर २० ते २५ दिवसांनी मुलीच्या वडिलांनी मुलाच्या वडिलाला कॉल करत प्रेमाला विरोध दर्शवला आणि तुम्हाला दोन मुले आहेत. त्यातील एकच मुलगा दिसेल. तुम्ही तुमच्या मुलाला समजावून सांगा, अशी धमकी दिली. मुलीचा भाऊ अधूनमधून मुलासोबत संपर्कात होता. रविवारी (२१ डिसेंबर) शरणापूर शिवारात असताना मुलाला मुलीच्या भावाचा कॉल आला. मला तुमचे घर पाहणे आहे. तू मला आंबेडकर चौक वाळूज एमआयडीसीत भेटायला ये, असे सांगितले. दुपारी १२ च्या सुमारास मुलगा दौलताबादकडे जाण्यासाठी निघाला. दौलताबाद येथून एका मित्राला सोबत घेतले. दोघे मुलीच्या भावाने सांगितलेल्या ठिकाणी त्याला घेण्यासाठी गेले. त्याला घेऊन मुलगा आणि त्याचा मित्र शरणापूर शिवारातील प्लॉटवर आले.

प्लॉटचे बांधकाम दाखवून गावाकडील घर दाखविण्यासाठी त्याला नेत असताना दुपारी तीनच्या सुमारास शरणापूर फाट्याच्या अलीकडे असलेल्या रेल्वे ब्रीजखाली मुलीच्या भावाने मला लघुशंका आली आहे, असे सांगून गाडी थांबवायला सांगितली. त्याचवेळी मुलीच्या भावाने मुलावर  चाकूने पाठीवर दोन वेळा वार केले. त्यानंतर खांद्यावर, मानेवर, कानाजवळ, डाव्या हातावर वार केले. रक्‍तबंबाळ होऊन मुलगा कोसळला. तो वडिलांना कॉल करत असताना मुलीच्या भावाने फोन हिसकावून घेतला आणि मोटारसायकल घेऊन निघून गेला. त्याचवेळी कुणीतरी माहिती दिल्याने तिथे पोलीस आले. पोलिसांनी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वसंत शेळके करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना

Latest News

Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुपारचे जेवण करत बसलेल्या कामगारांसाठी सुसाट कंटेनर काळ बनला. सर्व्हिस ट्रक, जेसीबी उभा करून...
Update : तलावात पोहत असताना दोन मुलांचा बुडून मृत्‍यू, हर्सूल सावंगीजवळील नायगावची दुर्दैवी घटना, दोन्ही मुले बायजीपुऱ्याचे!
धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना
३८ वर्षीय महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, वाळूज MIDC तील घटना
Update : तलावात पोहत असताना दोन मुलांचा बुडून मृत्‍यू, हर्सूल सावंगीजवळील नायगावची दुर्दैवी घटना, दोन्ही मुले बायजीपुऱ्याचे!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software