छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणूक : मतदान, मतमोजणीसाठी पोलीस प्रशासन सज्ज, ४,६६७ अधिकारी, अंमलदारांचा ४८ तास राहणार खडा पहारा!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी उद्या, १५ जानेवारीला मतदान होत आहे. त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहेत. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, प्रशांत स्वामी, शर्मिष्ठा घारगे वालावलकर, रत्नाकर नवले यांच्या नेतृत्वात तब्बल ४,६६७ अधिकारी, अंमलदारांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी मंगळवारी (१३ जानेवारी) सर्व वरिष्ठ अधिकारी, ठाणे प्रभारींची बैठक घेऊन आवश्यक सूचना केल्या. गुरुवार व शुक्रवारी (१५ व १६ जानेवारी : मतदान व मतमोजणीचे दिवस) तब्बल ४८ तासांहून अधिक काळ पोलीस डोळ्यांत तेल घालून असणार आहेत.
असा राहील बंदोबस्त
-पोलिसांच्या मदतीला १९२८ होमगार्ड असतील.
-एसआरपीएफची १ कंपनी व २ प्लाटूने शस्त्रधारी जवान संवेदनशील भागात तैनात.
-संवेदनशील ठिकाणी १० हून अधिक ड्रोनद्वारे लक्ष
-यापूर्वी निवडणुकांदरम्यान गुन्हा केलेल्या २८३ जण ४८ तासांसाठी हद्दपार,हद्दपार करण्यापूर्वी त्यांचे सकाळी ७ ते १० वाजेदरम्यान मतदान करून घेणार
-निवडणुकीदरम्यान ९०५ गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
-संपूर्ण निवडणूक कालावधीत २८ अट्टल गुन्हेगार हद्दपार करण्यात आले.
- एमपीडीए कायद्याअंतर्गत ४ कुख्यात गुन्हेगारांना राज्यातील अन्य कारागृहांत स्थानबद्ध करून ठेवले आहे.
-८४७ परवानाधारकांचे शस्त्र जमा करून घेण्यात आले आहे.

मतमोजणीसाठी काय खबरदारी...
महापालिका निवडणुकीची मतमोजणी गरवारे हायटेक फिल्म, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व सेंट फ्रान्सिस हायस्कूल या ४ ठिकाणी १६ जानेवारीला होणार आहे. मतमोजणीदरम्यान आणि त्याआधी सर्व मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात मोबाइल, टॅब्लेटच्या वापरास मनाई असणार आहे. आगपेटी, लायटर, तंबाखूजन्य पदार्थ घेऊन जाण्यासही बंदी असेल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या वाहनांनाच परिसरात प्रवेश असणार आहे.

मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये. कुठेही अनुचित प्रकार घडताना दिसल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणे टाळावे.
प्रवीण पवार, शहर पोलीस आयुक्त

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?

Latest News

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार? मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला ही म्हण दर उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरकरांच्या बाबतीत खरी ठरते....
ऑर्केस्ट्रामध्ये काम, खासगी कंपनीत नोकरी... आयुष्याशी संघर्ष हरला २९ वर्षीय तरुण!; चौका घाटात घेतला गळफास, पैठण, वैजापूर तालुक्यातही मजूर, शेतकऱ्याची आत्महत्या
लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश
८० वर्षांच्या वृद्धेवर ५४ वर्षांच्या पुरुषाचा लैंगिक अत्याचार, सोयगावची खळबळजनक घटना
Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software