झेंडा चौकात मध्यरात्री गांजा तस्कराच्या मुकुंदवाडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या!, १ लाखाचा गांजा जप्त, विशेष पथकाची कामगिरी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : झेंडा चौक मैदानावर मुकुंदवाडी पोलिसांच्या विशेष पथकाने आज, ३० नोव्‍हेंबरच्या पहाटे साडेबाराच्या सुमारास (मध्यरात्री) गांजा तस्कराच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून १ लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे. किशोर गणेश सांगळे (वय २१, रा. देऊळगाव राजा, जि. बुलडाणा) असे पकडण्यात आलेल्या गांजातस्कराचे नाव आहे.

पोलीस अंमलदार सागर शर्मा यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून किशोरला अटक केली आहे. शनिवारी (२९ नोव्‍हेंबर) रात्री साडेआठला पोलीस अंमलदार सागर शर्मा यांना गोपनीय बातमीदाराने माहिती दिली, की झेंडा चौक मैदानात किशोर सांगळे हा गांजा विकण्यासाठी येणार आहे. त्यांनी ही माहिती लगेचच पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांना दिली. त्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. बहुरे, पोलीस उपनिरीक्षक घोरपडे, पोलीस अंमलदार सागर शर्मा, विकास गुरखेल, संतोष बिरारे, रवींद्र बेंडे, सुखदेव जाधव, समाधान काळे, शैलेंद्र आडियाल, चालक पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर पवार, महिला पोलीस अंमलदार अनिता नायमाने यांचे पथक रविवारी (३० नोव्‍हेंबर) पहाटे साडेबाराच्या सुमारास (मध्यरात्री) झेंडा चौक मैदानावर कारवाईच्या लावाजाम्यासह दाखल झाले आणि सापळा लावून थांबले.

त्याचवेळी संशयित किशोर जाताना दिसून आला. पथकाने त्याच्याकडे धाव घेऊन थांबवले. त्याच्याकडे एक प्रवासी बॅग दिसून आली. बॅगमध्ये ५ बंडल होते. बंडलची पाहणी केली असता गांजा (कॅनबीस वनस्पती) दिसून आला. या गांजाचे वजन १० किलो २१६ ग्रॅम भरले. किशोरने गांजा विकत असल्याची कबुली दिली. एकूण १ लाख रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला. गांजा कुठून आणला, कुणाला विकत होता, याबाबत त्याने अद्याप तोंड उघडले नाही. पोलीस कसून चौकशी करत आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले करत आहेत. ही कारवाई विरेंद्र मिश्रा, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर, पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. बहुरे, पोलीस उपनिरीक्षक तथा विशेष पथकाचे प्रमुख श्री. घोरपडे, पोलीस अंमलदार सागर शर्मा, विकास गुरखेल, संतोष बिरारे, रवींद्र बेंडे, सुखदेव जाधव, समाधान काळे, शैलेंद्र आडियाल, चालक पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर पवार, महिला पोलीस अंमलदार अनिता नायमाने यांनी केली.

सागर शर्मा यांच्या कामगिरीत भर...
सागर शर्मा यांनी विशेष पथकात कार्यरत असताना आजवर अनेक धडाकेबाज कारवाया केल्या आहेत. दुचाकीचोरीचे अनेक गुन्हे त्यांनी आजवर उघड केले आहेत. यामुळे वरिष्ठांच्या नेहमी कौतुकास पात्र ठरत असतात. आताच्या कारवाईतही त्यांनी गोपनीय बातमीदाराकडून पक्की माहिती मिळवल्याने गांजा तस्कर गजाआड होऊ शकला. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश

Latest News

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...
भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना
सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software