लेडी डॉन राखी मुरमुरे आता ड्रग्ज रॅकेटमध्ये!, नगरनाक्याच्या पुढे अंधारात कारमध्ये दोन युवकांसोबत...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लेडी डॉन होण्याचे स्वप्न बाळगून असलेली राखी मुरमुरे आता ड्रग्ज धंद्याच्या लिप्त असल्याचे समोर आले. तिला तिच्या दोन साथीदार युवकांसोबत कारमध्ये अंधारात पकडण्यात आले. ही कारवाई नगरनाक्यापासून पंढरपूरकडे जाणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाच्या पुढे आज, (२४ डिसेंबर) पहाटे १२ च्या सुमारास (मध्यरात्री) करण्यात आली. राखी गणेश मुरमुरे (वय २६, रा. वरणगाव फाटा, नांदेड), तुषार निवृत्ती आगळे (वय ३१, रा. पुंडलिकनगर छत्रपती संभाजीनगर), अमोल लक्ष्मण इंगळे (वय ३०, रा. हनुमाननगर पुंडलिकनगर परिसर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहे.

शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विनायक शेळके यांना गोपनीय माहिती मिळाली, की कारमधून (क्र. एमएच २० एफयू ०६१५) एक महिला व दोन पुरुष हे नगर नाक्याकडून पंढरपूरकडे जाणाऱ्या रोडवर रेल्वे उड्डाणपुलाच्या पुढे जीवंत राऊंडसह गावठी कट्टा सोबत बाळगून नशेसाठीच्या औषधी गोळ्यांची विक्री करत आहेत. त्यानंतर श्री. शेळके, पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के, पोलीस उपनिरीक्षक कांचन मिरधे, पोलीस अंमलदार विजय त्रिभुवन, सतीश जाधव, नितेश सुंदर्डे, लालखान पठाण, गणेश काळे हे गोपनीय माहिती मिळालेल्या ठिकाणी रात्री पावणेबाराच्या सुमारास पोहोचले.

तिथे कारमध्ये राखी मुरमुरे, तुषार आगळे, अमोल इंगळे हे तिघे होते. त्यांच्याकडे नशेच्या ९९ गोळ्या मिळून आल्या. गावठी कट्टा, त्यात २ जीवंत राऊंड व कार असा एकूण १० लाख १० हजार ८०३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिघांविरुद्ध अंमलीपदार्थ प्रतिबंध विभागाचे पोलीस अंमलदार लालखान पठाण यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांनाही छावणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक जाधव करत आहेत. 

कोण आहे लेडी डॉन राखी?
राखी मुरमुरे ही एका पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी असून, शहरात गुन्हेगारांच्या संपर्कात आल्यानंतर ती गुन्हे जगतात उतरली. गेल्या ऑगस्टमध्ये कुख्यात गुन्हेगार फैजल तेजाने तिच्यावर गोळीबार केला होता. सर्वात आधी तिला ऑक्टोबर २०२५ मध्ये सिटी चौक पोलिसांनी एक पिस्तूल आणि जीवंत काडतुसांसह अटक केली होती. सोशल मीडियावर तिने गोळी हवेत झाडतानाचा व्हिडीओ टाकला होता, त्यानंतर तिच्यावर कारवाई करण्यात आली होती. आता तिच्याकडील कारमध्ये ५ कागदी बंडल आढळले, त्याला खालून वरून ५०० रुपयांच्या खऱ्या नोटा होत्या. त्यामागचा तिचा उद्देश पोलीस तपासातून समोर येईल. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software