छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या जलजीवन मिशनच्या कामांची होणार पाहणी!; ‘दिशा’ समिती बैठकीत खा. भुमरे यांचे निर्देश

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक तालुकानिहाय झालेल्या कामांची पाहणी करावी, असे निर्देश जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण अर्थात ‘दिशा’ समितीचे अध्यक्ष खा. संदिपान भुमरे यांनी आज, ३ नोव्हेंबरला दिले.

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण अर्थात दिशा समितीची बैठक  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी खासदार संदिपान पाटील भुमरे होते. राज्याचे इतर मागास वर्ग व बहुजन कल्याण, दुग्धविकास व उर्जा नुतनीकरण मंत्री अतुल सावे, समितीचे सह अध्यक्ष राज्यसभा सदस्य  खा. डॉ. भागवत कराड व लोकसभा सदस्य डॉ. कल्याण काळे, विधान परिषद सदस्य आ. संजय केणेकर, विधानसभा सदस्य आ. रमेश बोरनारे, आ.संजना जाधव, आ. विलास भुमरे, राज्य समितीचे सदस्य अजिनाथ धामणे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, अप्पर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे तसेच सर्व यंत्रणा प्रमुख आदी उपस्थित होते.
प्रारंभी २७ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तावर सदस्यांनी चर्चा केली. त्यात केंद्रशासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

त्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना,  प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), स्वच्छ भारत मिशन शहरी, जलजीवन मिशन, एकीकृत बालविकास योजना, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण अभियान, समग्र शिक्षा अभियान, राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम अशा विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या कामाची, घरकुल योजनेत होत असलेल्या कामांची, जलजीवन मिशन योजनेच्या कामांची पाहणी करण्यात यावी, असे निर्देश खा. भुमरे यांनी दिले.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी

Latest News

हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य सहकारी पाणन महासंघ, मुंबई तसेच राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) यांच्या संयुक्त...
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Good News : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रोबोटिक सांधेरोपण तज्‍ज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य उद्या, १२ मार्चला छत्रपती संभाजीनगरात
छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत गर्भपाताच्या प्रयत्नामुळे विवाहिता पोहोचली मृत्यूच्या दाढेत!; मृत्यूचा खेळ खेळणारे त्रिकूट पोलीस आल्याचे पाहून पळाले... नारेगावच्या घटनेने शहरात खळबळ
दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software