- News
- सिटी क्राईम
- हर्सूल जेलमध्ये पुन्हा चर्चेत : बराकीच्या गजांवर डोके आपटून कैद्याची आत्महत्या, यापूर्वीही ३ संशया...
हर्सूल जेलमध्ये पुन्हा चर्चेत : बराकीच्या गजांवर डोके आपटून कैद्याची आत्महत्या, यापूर्वीही ३ संशयास्पद मृत्यू
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : हर्सूल कारागृहातील सुरक्षेवर कायम प्रश्नचिन्ह उठत असतात. बॅरेकच्या गजावर डोके आपटून घेतल्याने ३१ वर्षीय बंदिवानाचा मृत्यू झाल्याचे आता समोर आले आहे. असलेल्या विजय ऊर्फ बोधीराम विक्रम गोरे (३१, रा. अंतरगाव ता. भूम, जि. धाराशिव) असे या बंदिवानाचे नाव आहे. तो वडिलांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. हर्सूल कारागृहात यापूर्वी ३ बंदिवानांचा असाच संशयास्पद मृत्यू झाला आहे. हर्सूल कारागृहातील व्यवस्थेची सखोल चौकशी होण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.
कारागृहाचे सुभेदार संजय अहिरराव यांच्या दाव्यानुसार, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी सातच्या सुमारास विजय बॅरेक क्रमांक १३ व १४ समोरील परिसरात फिरत असताना बॅरेक क्रमांक १३ समोरून जोरात धावत जाऊन त्याने बॅरेक क्रमांक १५ च्या लोखंडी गजावर स्वतःचे डोके जोरात आपटून घेतले. त्याच्या डोक्याला व तोंडाला दुखापत होऊन रक्तस्त्राव होत असल्यामुळे तत्काळ कारागृहातील रुग्णालयात नेण्यात आले. तिथून घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अधिकच बिघडल्याने मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे उपचारादरम्यान सोमवारी (६ ऑक्टोबर) त्याचा मृत्यू झाला. तशी माहिती भायखाळा जेलचे वरिष्ठ तुरुंग अधिकारी अनंत टेंगळे यांनी हर्सूल कारागृहाच्या अधीक्षकांना फोनवर कळविले.
हर्सूल कारागृहात सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत असतात. कधी गुन्हेगार पोलिसांवर हल्ला करतात, तर कधी संशयास्पद मृत्यू समोर येतात. गेल्याच महिन्यात कुख्यात बंदिवानांनी कारागृहातील अधिकारी, अंमलदारांवर हल्ला केल्याचे वृत्त मेट्रोपोलिस पोस्टने सर्वप्रथम समोर आणले होते. त्याआधी फेब्रुवारी २०२५ मध्ये राजू अवचार या बंदिवानाचा बाथरूममध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. पाच वर्षांपूर्वीही साळुजी मगरे या बंदिवानाचा बाथरूममध्येच मृत्यू झाला होता. त्याने आत्महत्या केल्याचा दावा कारागृह प्रशासनाने केला होता. जानेवारी २०१९ मध्येसुद्धा योगेश राठोड या बंदिवानाचा कारागृहात संशयास्पद मृत्यू झाला होता.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
By City News Desk
Latest News
17 Mar 2026 11:49:46
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : टवाळखोराने हद्दच केली. थेट ट्रॅव्हल्सच्या ऑफीसमध्ये घुसून तिकीट काढायला आलेल्या प्रवाशाचा मोबाइल हिसकावून चाकू...

