सिडको एन २ मध्ये बँक अधिकाऱ्याचे घर फोडून दागिने लंपास!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको एन २ मधील म्हाडा कॉलनीत बँक अधिकाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी सोने, चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी (२३ नोव्‍हेंबर) सकाळी समोर आली.

राजेंद्र विष्णू मगर (वय ५२, रा. खंडाळा, ता. वैजापूर, ह. मु. म्हाडा कॉलनी एन २ सिडको छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. कॉर्पोरेट डी. एस. ए होम लोन या बँकेत खासगी नोकरी करतात. शुक्रवारी (२१ नोव्‍हेंबर) सकाळी सहाला ते कुटुंबासह आईचे वर्षश्राध्द असल्याने मूळ गावी खंडाळा येथे गेले होते. घरातील लोखंडी कपाटात चार ग्रॅम सोन्याची चैन, चार ग्रॅमचे सोन्याचे कानातले व २३ हजार रुपये रोख तपकिरी रंगाच्या पर्समध्ये ठेवलेले होते. रविवारी (२३ नोव्‍हेंबर) सकाळी साडेअकराला मगर यांना शेजाऱ्याने कॉल करून तुमच्या घराचा दरवाजा उघडा दिसत असल्याचे सांगितले.

त्यामुळे मगर हे लगेच खंडाळा येथून छत्रपती संभाजीनगरला आले. दुपारी दीडला घरी आल्यावर त्यांनी पाहिले असता दरवाजाला लावलेले कुलूप दिसून आले नाही. दरवाजा उघडा दिसला. घरात पाहणी केली असता घरातील लोखंडी कपाट उघडे दिसले. त्यातील तपकिरी रंगाची पर्स पलंगावर ठेवलेली दिसली. पर्समधील सोन्याची चैन, कानातले व २३ हजार रुपये दिसून आले नाहीत. चोरट्याने एकूण ७१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले. अधिक तपास पोलीस अंमलदार संजय नंद करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खडकेश्वरमधील ती काळरात्र... २ भंगारवेचकांच्या अंगावरून चारचाकी गेली... एकाचा मृत्यू, दुसरा जखमी; जगण्यासाठीची धडपड थांबली...

Latest News

खडकेश्वरमधील ती काळरात्र... २ भंगारवेचकांच्या अंगावरून चारचाकी गेली... एकाचा मृत्यू, दुसरा जखमी; जगण्यासाठीची धडपड थांबली... खडकेश्वरमधील ती काळरात्र... २ भंगारवेचकांच्या अंगावरून चारचाकी गेली... एकाचा मृत्यू, दुसरा जखमी; जगण्यासाठीची धडपड थांबली...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मरणाने केली सुटका... जगण्याचे छळले होते... प्रसिद्ध कवींच्या या ओळी खडकेश्वर येथील मध्यरात्री घडलेल्या...
ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये टवाळखोराचा राडा, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवाशाला लुटले!; सिडको बसस्थानकाजवळील घटना
सिल्लोडमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला एसटी बसने उडवले, तरुणाचा जागीच मृत्यू
हलगर्जीपणाचा कळस : अचानक नदीपात्रात धरणातून पाणी सोडल्याने शेतकरी गायीसह गेला वाहून!; वैजापूर तालुक्यातील धक्कादायक घटना
पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software