- News
- सिटी क्राईम
- छत्रपती संभाजीनगरमध्ये जामिनाची ऑर्डर देत नाही म्हणून संशयिताच्या पित्याने वकील महिलेला धमकावल्याची
छत्रपती संभाजीनगरमध्ये जामिनाची ऑर्डर देत नाही म्हणून संशयिताच्या पित्याने वकील महिलेला धमकावल्याची तक्रार!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : संशयिताला जामीन मिळवून दिल्यानंतर वकील महिलेसोबत फीवरून वाद झाला. त्यानंतर जामिनाची ऑर्डर देत नाही म्हणून संशयिताच्या पित्याने वकील महिलेसोबत भांडण करत धमक्या दिल्याची तक्रार वकील महिलेने पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात केली आहे. ही घटना गुरुवारी (११ डिसेंबर) दुपारी चारला उच्च न्यायालयाच्या वकील कक्षात घडली.
गुजरातचे सोन्याचे व्यापारी विजयसिंह वसनाजी खिशी गेल्या ७ मे रोजी मुंबईतील त्यांच्या होलसेल फर्ममधून सुमारे ४ किलो ८७३ ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन शिर्डीत आले होते. त्यांच्यासोबत कामगार चंद्रप्रकाश प्रजापती आणि चालक सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित होते. ते हॉटेल साई सुनीता या हॉटेलमध्ये थांबले होते. १३ मे रोजी रात्री ११ ला त्यांनी जेवण केल्यानंतर रूममध्ये झोप घेतली. दागिन्यांची बॅग बेड आणि टेबलमध्ये ठेवली होती. रूम आतून बंद होती. तिघेही एकाच खोलीत झोपले होते. १४ मे रोजी सकाळी सहाला व्यापारी खिशी यांचा चुलत भाऊ शैलेंद्रसिंह पैसे घेण्यासाठी हॉटेलवर आला. दरवाजा उघडला असता तो उघडाच आढळला. सुरेशकुमार गायब होता. त्याचा मोबाइल फोन आणि कपडे रूममध्येच होते. सुमारे साडेतीन किलो सोन्याचे दागिने (किंमत ३ कोटी २२ लाख) आणि ४ लाख रुपयांची रोकड सुरेशकुमारने चोरून नेली होती. शिर्डी पोलीस ठाण्यात खिशी यांनी तक्रार दिली. त्याला अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. सुरेशकुमारच्या जामिनासाठी भुरसिंहने ॲड. स्मिता झावरे यांच्याकडे केस सोपवली होती. १० डिसेंबरला सुरेशकुमारला जामीन मंजूर झाला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
CPU, GPU आणि NPU मध्ये काय फरक?
By City News Desk
मिसारवाडीत खळबळ!; मंडप व्यावसायिकासह ३ रिक्षाचालक हैराण...
By City News Desk
Latest News
15 Dec 2025 21:20:06
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाणी, रस्ता आणि ड्रेनेज या मुलभूत सुविधांसाठी वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मध्ये महिलांनी...

