वडगाव कोल्हाटीतील महिलांचे उपोषण मागे, ग्रामपंचायतीने लेखी दिले, पोलिसांनी मन वळवले!, सकाळपासून सायंकाळपर्यंत काय घडलं...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाणी, रस्ता आणि ड्रेनेज या मुलभूत सुविधांसाठी वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मध्ये महिलांनी सुरू केलेले उपोषण अखेर आज, १५ डिसेंबरला सायंकाळी पाचव्या दिवशी सुटले. ग्रामपंचायतीने लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्या ज्योती कांबळे यांनी सरपंच सुनील काळे आणि वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन उपोषण सोडले.

आज सकाळी ज्योती कांबळे यांची प्रकृती कमालीची खालावली होती. सरकारी डॉक्टर शंकर देशपांडे यांनी पोलिसांना अहवाल देऊन कांबळे यांच्यावर तातडीने औषधोपचाराची गरज असल्याचे सांगितले. सलग ४ दिवसांपासून अन्न-पाण्याचा कणही पोटात न गेल्याने कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकत होते. त्यामुळे पोलीस यंत्रणाही तणावाखाली आली होती. अनुचित प्रकार घडला तर आपल्यावर शेकू शकते, ही जाणीव झालेल्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी मागण्यांच्या पूर्ततेचे लेखी पत्र तयार केले. त्यानुसार जलजीवन मिशन अंतर्गत जल योजनेचे काम लवकरच मार्गी लावण्याचे आणि रस्त्याचे काम निधी उपलब्ध होताच ६० दिवसांपर्यंत पूर्ण करण्याचे आणि ड्रेनेज लाइनचे काम मुख्य लाइनला जोडणे शक्य होईल तितके करून देण्याचे आश्वासन दिले. मागील पत्रासारखा शाब्दिक खेळ आजच्या पत्रात टाळण्यात आला. उपोषण सोडविण्यासाठी पोलिसांनी ज्योती कांबळे यांचे मन वळवले. गोपनीय शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेख सलीम, पोलीस अंमलदार नीलेश पाटील यांचे प्रयत्न यशस्वी ठरले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

CM फडणवीस चक्क छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी अन्‌ अनुसूचित जातीचे... रमाई आवास योजनेत मोठा घोटाळा?; जलील यांनी फोडले ‘टोळी’चे बिंग!, सावेंवर काय केले आरोप...

Latest News

CM फडणवीस चक्क छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी अन्‌ अनुसूचित जातीचे... रमाई आवास योजनेत मोठा घोटाळा?; जलील यांनी फोडले ‘टोळी’चे बिंग!, सावेंवर काय केले आरोप... CM फडणवीस चक्क छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी अन्‌ अनुसूचित जातीचे... रमाई आवास योजनेत मोठा घोटाळा?; जलील यांनी फोडले ‘टोळी’चे बिंग!, सावेंवर काय केले आरोप...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी गुरुवारी (१२ मार्च) पत्रकार परिषद घेऊन शहरातील रमाई आवास...
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
‘देवगिरी’ सर करण्याआधी प्रत्येक पर्यटकाची कसून तपासणी! आग निष्काळजीपणानेच लागल्याचा संशय
छत्रपती संभाजीनगरात उद्यापासून जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे प्रवचन, दर्शन सोहळा
एक लांडगा घरासमोर आला... असहायपणे उपचार करा म्हणाला, उपचार होताच जंगलात परत गेला... पुस्तकातील गोष्ट नव्हे, फर्दापूरची खरीखुरी घटना आहे!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software