छत्रपती संभाजीनगरच्या ‘विघ्नहर मल्टीस्टेट’कडून ठेवीदाराला १ कोटीचा गंडा!; नव्या घोटाळ्याची चाहुल, ५० ठेवीदारांना धक्का, ५ कोटींहून अधिक ठेवी...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : आदर्श पतसंस्थेच्या घोटाळ्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण ९ पतसंस्था, क्रेडिट सोसायट्यांमध्ये घोटाळे समोर आले. ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले. असे असले तरी पतसंस्थांचा मोहपाश काही सुटताना दिसत नाही. ठेवीवर जास्त व्याजाचे आमिष दाखवले, की लोक अजूनही पतसंस्थांवर विश्वास ठेवत आहेत. आता नवा घोटाळा समोर आला आहे. विघ्नहर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडने एक वर्षासाठी ठेव ठेवल्यास त्यावर १० ते १२ टक्केपर्यंत व्याज मिळेल, असे सांगून एका ठेवीदाराला १ कोटीने गंडा घातला आहे. अशाप्रकारे सुमारे ५० ठेवीदारांच्या एकूण फसवणुकीची रक्कम ५ कोटींच्या घरात जात आहे. जवाहरनगर पोलिसांनी पतसंस्थेच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पतसंस्थेचे संचालक डॉ. क्याटमवार, विरसिंहजी, आर. जी. बाहेती (सर्व रा. वसमत, जि. हिंगोली) यांच्यासह मृत अध्यक्ष तथा प्रमुख सल्लागार मथुरादास देशमुख (रा. बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात शेख तौफीक मोहमंद शफी (रा. टाईम्स कॉलनी, कटकट गेट, छत्रपती संभाजीनगर) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, पतसंस्थेचे अध्यक्ष मथुरादास देशमुख यांची कामानिमित्त भेट झाल्यानंतर त्यांनी विघ्नहर पतसंस्थेत १ वर्षासाठी ठेवी ठेवल्यास त्यावर १० ते १२ टक्क्यांपर्यंत व्याजाचा परतावा मिळतो, असे आमिष दाखवले. त्यामुळे तौफीक यांनी पतसंस्थेत बचत खाते उघडले. त्यात  पाच टप्प्यात १ कोटी ५ हजार ५०० रुपये जमा केले. ९१ दिवसांसाठी ९३ लाख ५ हजार ५०० रुपये गुंतविल्यानंतर २ लाख ८ हजार ८०० रुपये व्याज मिळेल, असे सांगितले होते. आमिषाला बळी पडून तौफीक यांनी १ एप्रिल २०२५ रोजी ९३ लाख ५ हजार ५०० रुपये मुदत ठेव म्हणून पैसे गुंतवले. ही ठेव १ जुलैला पूर्ण होणार होती. त्यापूर्वीच तौफीक यांना पैशाची गरज पडल्याने ते शाखेत गेले. तेव्हा शाखा व्यवस्थापकाने अध्यक्ष देशमुख यांना कॅन्सर झाला असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगितले.

त्यानंतर तौफीक हे वारंवार शाखेत गेले तरी पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. मथुरादास देशमुख यांचे २६ जून २०२५ रोजी निधन झाले. त्यानंतर शाखाच बंद झाल्याचे आढळले. त्यामुळे तौफीक यांनी पोलिसांत धाव घेतली. जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या पतसंस्थेत छत्रपती संभाजीनगरमधील ५० हून अधिक ठेवीदारांनी ५ कोटींहून अधिक रक्कम गुंतवलेली असल्याचे समोर येत आहे. त्यांचीही फसवणूक करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, तौफीक यांच्या तक्रारीनंतर आता अन्य ठेवीदारही तक्रारीसाठी समोर येण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा घोटाळ्याचा आकडा वाढू शकतो. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

Latest News

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software