चेष्टा मस्करी वाढली, हाणामारी सुरू झाली... युवक जखमी, सिडको एन ६ मधील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दोन मित्रांमध्ये चेष्टा मस्करी सुरू असताना दुसऱ्या दोघांनी येऊन युवकाला बेदम मारहाण करत कोल्ड्रिंकची बाटली फोडून मारत जखमी केले. ही घटना सिडको एन ६ बॉटनिकल गार्डनजवळ शनिवारी (१३ डिसेंबर) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

नितीन तानाजी रणखांब (वय ३०, रा. सद्‌गुरू हौसिंग सोसायटी एन ८ सिडको) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते आई- वडील, भावासह राहतात. त्यांचे वडील रिक्षा चालवतात. शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास नितीन हे सिडको एन ६ बॉटनिकल गार्डनजवळील देवीच्या मंदिरात गेले होते. तिथे त्यांचा मित्र सौरभ लिहणार (रा. आंबेडकरनगर) भेटला. दोघे बोलत उभे असताना तेथे सौरभच्या ओळखीचे तीन जण आले. नितीन व सौरभ एकमेकांची चेष्टा मस्करी करत असताना त्या तिघांपैकी एकाने ‘तू सौरभची चेष्टा मस्करी का करतो’, असे म्हणत नितीन यांच्यासोबत वाद सुरू केला. त्यानंतर तिघांपैकी दोघांनी शिवीगाळ करून हाताचापटाने नितीन यांना मारहाण केली. एकाने शितपेयाची बाटली फोडली आणि नितीन यांच्या डाव्या कानावर मारून जखमी केले. नंतर सर्वजण पळून गेले. घाटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर नितीन यांनी सिडको पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नितीन हल्लेखोरांना ओळखत नाहीत. हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत. अधिक तपास पोलीस अंमलदार शिवाजी भोसले करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी

Latest News

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता गहाण ठेवून उचललेल्या ३० कोटींच्या कर्जापैकी तब्बल १६...
CM फडणवीस चक्क छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी अन्‌ अनुसूचित जातीचे... रमाई आवास योजनेत मोठा घोटाळा?; जलील यांनी फोडले ‘टोळी’चे बिंग!, सावेंवर काय केले आरोप...
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
‘देवगिरी’ सर करण्याआधी प्रत्येक पर्यटकाची कसून तपासणी! आग निष्काळजीपणानेच लागल्याचा संशय
छत्रपती संभाजीनगरात उद्यापासून जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे प्रवचन, दर्शन सोहळा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software