- News
- सिटी क्राईम
- छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण, सिडको एन ८ आणि वानखेडेनगरातील घटनांनी खळबळ
छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण, सिडको एन ८ आणि वानखेडेनगरातील घटनांनी खळबळ
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मोबाइल बघत असल्याने वडील रागावले. त्यामुळे १६ वर्षीय मुलाने घर सोडले. बराच शोध घेऊनही तो मिळून न आल्याने अखेर पित्याने सिडको पोलिसांत अपहरणाची तक्रार नोंदवली आहे. ही घटना सिडको एन ८ मध्ये शनिवारी (१३ डिसेंबर) सायंकाळी घडली.
वानखेडेनगर एन १३ हडको येथून १७ वर्षीय मुलगा घरातून बेपत्ता झाला आहे. त्याच्या वडिलांनी बेगमपुरा पोलिसांत शनिवारी (१३ डिसेंबर) अपहरणाची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे. तक्रारीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेआठला मुलाचे वडील कामानिमित्त पडेगावला गेले होते. जेवणासाठी दुपारी २ ला घरी आले. त्यावेळी मोठा मुलगा घरी नसल्याने त्यांनी पत्नीला विचारले असता त्यांनी सांगितले, की तो सकाळी साडेअकराला टीव्ही सेंटरला जातो, असे सांगून गेला आहे. दुपारी सव्वादोनला त्याला वडिलांनी कॉल केला असता तो अर्ध्या तासात येतो, असे म्हणाला. मात्र रात्री सव्वाआठनंतर त्याचा मोबाइल बंद येऊ लागला.त्यामुळे त्याच्या वडिलांनी भावाकडे, नातेवाइकांकडे चौकशी केली. तिथेही मुलगा गेलेला नव्हता. त्याला कुणीतरी फूस लावून पळल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार गजानन तुपे करत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
By City News Desk
Latest News
13 Mar 2026 11:02:27
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या गटाने चक्क भाजपला साथ दिली. ही...

