वाळूज एमआयडीसीतील गुरुमाऊली इंजिनिअरिंग कंपनीत भीषण आग!; १ कोटीवर नुकसान

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील एम. एस. गुरुमाऊली इंजिनिअरिंग कंपनीला (प्लॉट नं. ई-११५) आज, २० जानेवारीला दुपारी साडेबाराच्या सुमारास भीषण आग लागली. यात १ कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पॅकिंग मटेरियलच्या स्टोअर रूमला तसेच कंप्रेसरला आग लागली. त्यानंतर आगीने पूर्ण कंपनीत कवेत घेतली. माहिती मिळताच वाळूज अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. फायर बंबाच्या सहाय्याने आग विझवण्याचे काम सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर दुपारी १:३८ वाजता आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अनिल एस. देशमुख (उप अग्निशमन अधिकारी), एल. जी. ब्रह्मांकर (फायर लीडर), योगेश काळे (ऑपरेटर) यांच्यासह आर. जे. जात, सी. एस. पाटील, पी. एस. खाडे, एस. ए. कांदे, एस. बी. सोनेवणे, पी. के. राठोड, टी. बी. तांडले, व्ही. एस. दाभाडे, एन. एस. पारखे, पी. डी. घुगे (अग्निशमन कर्मचारी) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software