वाढत्या गर्दीचा ताण विशेष रेल्वेंवर भागवणे सुरू, छत्रपती संभाजीनगरातून आणखी ३ विशेष रेल्वे धावणार...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरातून दिल्ली, उत्तर भारतात जाण्यासाठी नियमित रेल्वेची गरज असताना विशेष रेल्वेवर भागवणे सुरू आहे. आताही ३ नवीन विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत.  चंदीगड- नांदेड, दिल्ली (हजरत निजामुद्दीन)-नांदेड, अमृतसर- चेरलापल्ली मार्गावर या विशेष रेल्वे धावणार आहेत.

अमृतसर-चेरलापल्ली (०४६४२) रेल्वे अमृतसरहून २३ आणि २४ जानेवारीला पहाटे ३.५५ वाजता सुटेल. ती छत्रपती संभाजीनगरमध्ये दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी येईल. हीच रेल्वे (०४६४२) रेल्वे चेरलापल्लीहून २५ व २६ जानेवारी रोजी दुपारी ३.४० वाजता निघेल. परत छत्रपती संभाजीनगरला ३ वाजून ४० मिनिटांनी येईल.
चंदीगड- नांदेड (०४५२४) रेल्वे चंदीगड येथून २३ व २४ जानेवारीला रोजी पहाटे ५.४० वाजता सुटेल. ती छत्रपती संभाजीनगरला सकाळी सव्वा आठला येईल. परतीच्या प्रवासात हीच रेल्वे (०४५२३) नांदेड येथून २५ आणि २६ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता निघेल. छत्रपती संभाजीनगरला मध्यरात्री सव्वाला येईल.
दिल्ली-नांदेड (०४४९४) रेल्वे दिल्ली येथून २३ आणि २४ जानेवारीला दुपारी १२.३० वाजता सुटेल. ती छत्रपती संभाजीनगरला सकाळी १० वाजून २० मिनिटांनी येईल. परतीच्या प्रवासात रेल्वे (०४४९३) नांदेडहून २४ व २५ जानेवारी रोजी रात्री ८.१० वाजता सुटेल. ती रात्री १२ वाजून १८ मिनिटांनी छत्रपती संभाजीनगरला येईल.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
दारूच्या नशेत मित्रानेच आवळला मित्राचा गळा!; खुनाचे गूढ २४ तासांत उकलले, बिडकीनजवळील पैठणखेड्याची घटना
Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प!
बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software