आत्‍महत्‍येपूर्वी व्हिडीओ तयार करून बटाटा व्यापाऱ्याने घेतला गळफास!; वैजापूरमधील धक्कादायक घटना, ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ७ जणांनी पैशांचा इतका तगादा लावला, की बटाटा व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही धक्कादायक घटना वैजापूर शहरातील गोल्डननगर येथे आज, २० जानेवारीला सकाळी समोर आली. आत्‍महत्‍येपूर्वी व्‍यापाऱ्याने व्हिडीओ बनवून ७ जणांची नावे घेतली. त्यावरून वैजापूर पोलिसांनी ७ जणांविरुद्ध आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

अन्नू आझाम शेख (रा. गोल्डननगर वैजापूर), वसीम बाबू बागवान (रा. गंगापूर), विलास शेटे (रा. श्रीरामपूर), घायवट बाई (रा. फुलेवाडी रोड, वैजापूर), विनोद प‌द्मसिंग राजपूत (रा. मढी परदेशी गल्ली वैजापूर), मुकेश प‌द्मसिंग राजपूत (रा. महाराणा प्रताप रोड वैजापूर), विक्रम शिवसिंग राजपूत (रा. महाराणा प्रताप रोड वैजापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध रिजवान शौकत खान (वय ३०, रा. दर्गा बेस वैजापूर) यांनी तक्रार दिली आहे. ते कुटुंबासह राहतात. त्यांचे मामा करीम चुन्नू शेख हे गोल्डननगर, वैजापूर येथे राहतात. त्यांचे मामा शेतकरी, व्यापाऱ्यांकडून होलसेलमध्ये तसेच आठवडे बाजारात दुकान लावून बटाटा खरेदी- विक्रीचा व्यवसाय करत होते. १४ जानेवारीला मकरसंक्रांत सणाच्या दिवशी सायंकाळी करीम शेख हे रिजवान यांना भेटले. ते म्हणाले की, मी बटाटा खरेदी-विक्रीचा व्यापार करण्यासाठी काही लोकांकडून पैसे घेतले असून, ते लोक मला पैशासाठी खूप परेशान करत आहेत. मी त्यांना त्यांचे पैसे दिले आहेत. परंतु तरीही ते लोक जास्तीचे पैसे मागून परेशान करत आहेत. त्यावेळी रिजवान यांनी पोलिसांत तक्रार करायला सांगितले.

मात्र करीम यांनी त्या लोकांना घाबरून तक्रार दिली नाही. सोमवारी (१९ जानेवारी) वैजापूर येथील आठवडे बाजारात बटाट्याच्या दुकानावर संध्याकाळी सहाला करीम हे रिजवान यांना म्हणाले, की आज सकाळी घायवट बाई व विनोद राजपूत हे पैसे मागण्यासाठी घरी व दुकानावर आले होते. त्यांनी पैसे दे म्हणून शिवीगाळ केली. विक्रम राजपूत देखील दुकानावर पैसे मागायला आला होता. त्यावेळी रिजवान यांनी त्यांना सांगितले की, आपण उद्या त्यांना भेटून पैशाचा हिशोब करू. त्यानंतर आज, २० जानेवारीला सकाळी सव्वा सातच्या सुमारास घरी असताना रिजवान यांना कळले, की करीम शेख यांनी फाशी घेतली आहे.

ते लगेचच मामा करीम यांच्या घरी गेले. करीम यांचा मुलगा जियान करीम शेख याने रिजवान यांना सांगितले की, वडील करीम यांनी मोबाइलमध्ये व्हिडिओ तयार करून आत्महत्या केली आहे. त्या व्हिडिओत अन्नू आझाम शेख (रा. गोल्डननगर वैजापूर), वसीम बाबू बागवान (रा. गंगापूर), विलास शेटे (रा. श्रीरामपूर), घायवट बाई (रा. फुलेवाडी रोड, वैजापूर), विनोद प‌द्मसिंग राजपूत (रा. मढी परदेशी गल्ली वैजापूर), मुकेश प‌द्मसिंग राजपूत (रा. महाराणा प्रताप रोड वैजापूर), विक्रम शिवसिंग राजपूत (रा. महाराणा प्रताप रोड वैजापूर) यांनी पैशाच्या कारणावरून दिलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगितले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पडाळे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहरासह जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा!; गहू, हरभरा,  मका, कांद्याचे १०० टक्के नुकसान, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

Latest News

शहरासह जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा!; गहू, हरभरा,  मका, कांद्याचे १०० टक्के नुकसान, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शहरासह जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा!; गहू, हरभरा,  मका, कांद्याचे १०० टक्के नुकसान, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हिंदू नववर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. बुधवारी (१८ मार्च)...
मागे न पाहताच रिव्हर्स घेणारा हायवा ठरला १८ वर्षीय मनस्वीचा काळ!; रुग्णालयात वडिलांना डबा घेऊन जात होती, चिकलठाण्याजवळील दुर्दैवी घटना
ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औषध निरीक्षक गट-ब चाळणी परीक्षा २२ मार्चला; छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ हजार ६४० उमेदवार देणार परीक्षा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software