वेरूळची धक्कादायक घटना : लॉजच्या रूममध्ये शिरताच प्रेयसीकडून पैशांसाठी ब्लॅकमेल, पुरुषाने तिच्या समोरच गळफास घेऊन केली आत्‍महत्‍या!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : प्रेमसंबंध असलेल्या महिलेसोबत लॉजवर गेल्यानंतर तिने ब्लॅकमेल सुरू केल्याने ५१ वर्षीय व्यक्तीने लॉजच्या खोलीतच गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही खळबळजनक घटना मंगळवारी (२० जानेवारी) सायंकाळी साडेसहाला वेरूळ (ता. खुलताबाद) येथील हॉटेल शिवसेवा रेसिडेन्सी लॉजिंग ॲन्ड रेस्टॉरंटमध्ये घडली.

दीपक भाऊराव खरात (वय ५१, रा. बनेवाडी, रेल्वेस्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर) असे आत्‍महत्‍या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते वाळूज एमआयडीसीतील खासगी ऑटो कंपनीत सुपरवायझर होते. त्यांचा मुलगा आकाश (वय २७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून खुलताबाद पोलिसांनी जयश्री राजू बनकर (वय ४६, रा. गौतमनगर, आसेफिया कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, बऱ्याच दिवसांपासून दीपक खरात यांचे ओळखीच्या जयश्रीसोबत प्रेमसंबंध होते. त्या कारणावरून त्यांच्या घरातही नेहमीच वादविवाद होत असत.

जयश्रीसोबत प्रेमसंबंध ठेवू नका, म्हणून घरच्यांनी अनेकदा दीपक खरात यांना समजावून सांगितले. मात्र ते भेटायला जातच होते. कामाचे पैसेही ते जयश्रीला देऊन टाकायचे. त्यामुळे दीपक खरात हे नेहमीच आर्थिक अडचणीत असायचे. मंगळवारी ते जयश्रीसोबत वेरूळला शिवसेवा लॉजवर गेले. तिथे जयश्रीने पैशाची मागणी करून ब्लॅकमेल केल्याने मानसिक तणावाखाली येऊन दीपक खरात तिच्या समक्षच गळफास लावून घेत आत्‍महत्‍या केली, असे तक्रारीत म्हटले आहे. खरात यांना आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्याप्रकरणी खुलताबाद पोलिसांनी जयश्रीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे करत आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘या’ गोष्टींना प्रतिबंध, उमेदवारांनो, नीट वाचून घ्या, नाहीतर गोत्यात याल!

Latest News

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘या’ गोष्टींना प्रतिबंध, उमेदवारांनो, नीट वाचून घ्या, नाहीतर गोत्यात याल! जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘या’ गोष्टींना प्रतिबंध, उमेदवारांनो, नीट वाचून घ्या, नाहीतर गोत्यात याल!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. ५ फेब्रुवारी रोजी...
वेरूळची धक्कादायक घटना : लॉजच्या रूममध्ये शिरताच प्रेयसीकडून पैशांसाठी ब्लॅकमेल, पुरुषाने तिच्या समोरच गळफास घेऊन केली आत्‍महत्‍या!
कन्नड हादरले : वंदनाने गुप्तांग दाबून मारले, धीरजने डोक्यात घातले शस्‍त्राचे वार, माजी सरपंचपूत्राच्या हत्‍येचे गूढ उकलले!!
छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी ‘व्हॉइस ऑफ फ्युचर’ सेमिनार!, विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजकांची नोंदणी सुरू...
बिडकीनजवळील जुगार अड्ड्यावर छापा, ‘या’ ७ जणांना पकडले!‌
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software