एएस क्लब सिग्नलवर दारूड्या ट्रकचालकाने माजवली दहशत; रस्त्यावर ट्रक आडवा लावून थेट पोलिसांनाच आव्हान!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील ए. एस. क्लब सिग्नलजवळ आज, २० जानेवारीला दुपारी १ च्या सुमारास मद्यधुंद अवस्थेतील ट्रकचालकाने रस्त्यावर दहशत माजवली. रस्त्यावर ट्रक आडवा लावून थेट ‘जे करायचे ते करा’, असे म्हणत आव्हान दिल्याचे प्रत्‍यक्षदर्शींनी सांगितले.

अहिल्यानगरकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा ट्रक (क्र. एमएच १४ डीएम ७७१६) संशयास्पदरीत्या डुलत धावत असताना वाळूज वाहतूक पोलिसांनी थांबवला. ट्रकचालक बप्पासाहेब शेषराव लकडे (रा. खामगाव) याच्या तोंडातून दारूचा उग्र वास येत असल्याने चौकशी करताच चालकाने उद्धटपणे दारू पिल्याची कबुली देत परवाना दाखवण्यास नकार दिला. पोलिसांशी अरेरावी सुरू केली. इतक्यात चालकाचा मित्र अनिल भाऊसाहेब नवले (रा. लांझी वाळूज) हा दुचाकीने  तिथे आला. दोघांनी मिळून वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालत दमदाटी केली. ट्रकचालक थेट धावत जाऊन पुन्हा ट्रकमध्ये चढला यू-टर्न घेत वैजापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सिग्नलवरच ट्रक आडवा उभा केला. काही सेकंदांतच संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान राखत तत्काळ दोघांनाही ताब्यात घेतले. क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. दोघेही मद्यधुंद असल्याचे स्पष्ट झाले. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software