गुटखामाफिया मालपाणीच्या अटकेनंतर वाळूज MIDC पोलिसांनी घरावर छापा मारून जप्त केला पावणेआठ लाखांचा गुटखा!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वाळूज महानगर येथील देवगिरी भागात एका घरात छापा मारून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गुटख्याचा  ७ लाख ८३ हजार ९०० रुपयांचा साठा जप्त केला आहे. गुटखामाफियाच्या कसून चौकशीत या साठ्याची माहिती मिळाली होती. ही कारवाई मंगळवारी (२ सप्‍टेंबर) करण्यात आली.

२८ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा अकराला वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांनी सहकाऱ्यांसह मिळून धुळे- सोलापूर हायवेवरील एएस क्लब चौकाजवळ गुटखा माफिया उमेश श्यामलाल मालपाणी (वय ३३, रा. वावरे चाळ पोलीस स्टेशनशेजारी, मनमाड ता. नांदगाव जि. नाशिक) याला अटक केली होती. त्‍याच्याकडे ४० हजार रुपयांचा गुटखा मिळून आला होता. मालपाणीची कसून चौकशी केली असता त्‍याने साथीदार संदीप उत्तमराव हिरे (वय ३८, रा. मदन किराणाजवळ नारळीबाग) याच्यासोबत मिळून देवगिरी वाळूज महानगर येथे एका घरात गुटखा साठवून ठेवल्याचे सांगितले.

पोलिसांनी तिथे छापा मारला असता एकूण ७ लाख ८३ हजार ९०० रुपयांचा गुटख्याचा साठा मिळून आला. मालपाणीविरुद्ध यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. या गुन्ह्यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश बन करत आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश बन, पोलीस अंमलदार बाबासाहेब काकडे, जालींदर रेधे, सुरेश कचे, विलास वाघ, हनुमान ठोके, सुरेश भिसे, वैभव गायकवाड, रोहित चिंधाळे, नितीन इनामे, समाधान पाटील, लखन गुसिंगे, संतोष बमनात, संदिप तागड, शिवनारायण नागरे यांनी केली.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software