ड्रग्‍जमाफिया कल्पेश अग्रवाल जेरबंद!; अलिशान कारने आमखास मैदानावर येताच पोलिसांनी घातली सिनेस्‍टाइल झडप!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : धुळ्याहून छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रग्ज पुरवणाऱ्या माफियाला शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी (९ ऑक्‍टोबर) मध्यरात्री १२ वाजता पकडले. अलिशान कारमधून येत शहरातील आमखास मैदानावर ड्रग्‍ज तस्कराला तो भेटताच पोलिसांनी हल्लाबोल केला. कल्पेश चंदुलाल अग्रवाल (वय ३८, रा. पद्‌मनाभनगर, धुळे) व सय्यद नबी सय्यद लाल (वय ३३, रा. वाळूज) अशी तस्करांची नावे आहेत.

शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांना माहिती मिळाली होती, की आमखास मैदान परिसरात एका अलिशान कारमधून गोळ्यांची तस्करी होणार आहे. त्यामुळे पवार यांनी सहकारी सहायक पोलीस निरीक्षक विनायक शेळके, रविकांत गच्चे यांच्या पथकासह आमखास मैदानाजवळ सापळा रचला. संशयित कार (क्र. एम एच ४८ एडब्ल्यू-२०१२) मैदानावर आली. तिथे आधीच सय्यद नबी प्रतीक्षा करत होता. कारमधून अग्रवाल उतरताच पथकाने हल्लाबोल केला. दोघांनाही ताब्‍यात घेतले. कारमध्ये अग्रवालने चालकाच्या सीटसमोरील भागात १०० गोळ्यांचे पाकीट लपवलेले होते. कारच्या तपासणीत ते जप्त करण्यात आले. दोघांविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळ्याहून छत्रपती संभाजीनगरात करायचा पुरवठा...
अग्रवाल हा धुळ्यात नशेच्या गोळ्या खरेदी करायचा. या वेळी आठ बॉक्स खरेदी केली होते. पैकी चार बॉक्स त्याने सय्यद नबी व मुकुंदवाडीतील अमली पदार्थांचा कुख्यात विक्रेता ज्ञानेश्वर मनोहर यादव उर्फ माऊली (रा. जयभवानीनगर) याला विकले. ज्ञानेश्वरविरुद्ध यापूर्वीसुद्धा गंभीर गुन्हे दाखल आहेत. आता पोलीस त्याला शोधत आहेत. अग्रवाल १०० टक्‍के अनुदानित खासगी शिक्षण संस्थेत शिपाई असून, तो मेव्हण्याची अलिशान कार तस्करीसाठी वापरत होता. पोलिसांनी कार जप्त केली. अग्रवाल व सय्यद नबीला न्यायालयाने १५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोदी, पोलीस अंमलदार नवनाथ खांडेकर, प्रकाश गायकवाड, अमोल शिंदे, मंगेश शिंदे, सागर पांढरे, संतोष चौरे यांनी कारवाई केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?

Latest News

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार? मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला ही म्हण दर उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरकरांच्या बाबतीत खरी ठरते....
ऑर्केस्ट्रामध्ये काम, खासगी कंपनीत नोकरी... आयुष्याशी संघर्ष हरला २९ वर्षीय तरुण!; चौका घाटात घेतला गळफास, पैठण, वैजापूर तालुक्यातही मजूर, शेतकऱ्याची आत्महत्या
लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश
८० वर्षांच्या वृद्धेवर ५४ वर्षांच्या पुरुषाचा लैंगिक अत्याचार, सोयगावची खळबळजनक घटना
Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software