देवगिरी कॉलेजजवळ विद्यार्थ्यावर कटरचे वार, ३ टवाळखोरांचा कहर, विद्यार्थी इतका घाबरला की तक्रारही देईना...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्‌स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे एनसीसी सरावासाठी जाणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थ्याला ३ टवाळखोरांनी अडवून शिवीगाळ, दमदाटी करत कटरने वार केले. यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा विद्यार्थी इतका घाबरला, की त्याने पोलिसांना तक्रार देण्यासही नकार दिला. अखेर स्वतः पोलिसांनीच या प्रकरणात तक्रार देत गुन्हा दाखल करून घेतला आणि त्या  टवाळखोरांचा कसोशीने शोध सुरू केला आहे.

परशुराम विठ्ठलराव सोळुंके (वय १८, रा. संध्या रेसीडेन्सी बन्सीलालनगर, छत्रपती संभाजीनगर, मूळ रा. नागापूर ता. परळी जि.बीड) असे गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. बुधवारी (३ डिसेंबर) पहाटे सव्वापाचच्या सुमारास परशुराम विट्‌स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजच्या रोडने जात असताना विट्‌स हॉटेल चौकाकडून तीन टवाळखोर तरुण मोटारसायकलीवरून आले. सुरुवातीला पुढे गेल्यानंतर परत ते मागे वळले. परशुरामला म्हणाले, की तू इकडे कुठे चालला आहे. त्यावेळी परशुरामने त्यांना सांगितले, की मी देवगिरी कॉलेजमध्ये शिकतो. एनसीसीच्या सरावासाठी मैदानावर चाललो आहे. त्यावेळी टवाळखोरांनी परशुरामला शिवीगाळ केली.

म्हणाले, की इकडे फिरायचे नाही. त्यांनी परशुरामला हाताचापटाने मारहाण केली. त्यापैकी एकाने ज्याचे वय अंदाजे २० वर्षे असेल, अंगात स्वेटर व कानटोपी व तोंडाला रूमाल बांधलेला होता, त्याने कटरने परशुरामच्या पोटात वार केले. त्यामुळे परशुराम घाबरून पळाला. तेव्हा टवाळखोरही पळून गेले. त्यानंतर परशुरामने बन्सीलालनगर स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवेकरी अजिंक्य तांबे यांना कॉल करून बोलावून घेतले. त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी मोटारसायकलीने सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. तिथून सकाळी साडेआठला घाटी रुग्णालयात हलवले. सध्या परशुरामची प्रकृती ठीक आहे.

इतका घाबरला की तक्रार देईना...
ही घटना वेदांतनगर पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी परशुरामची भेट घेऊन घडलेला प्रकार जाणून घेतला. परशुराम इतका घाबरलेला आहे, की त्याने टवाळखोरांची तक्रार देण्यासही नकार दिला. दोन दिवस पोलिसांनी तो तक्रार देईल याची वाट पाहिली. अखेर स्वतः पोलीस अंमलदार जितेंद्र ठाकूर यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यावरून ३ टवाळखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ पाठे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कल्पनाची ‘तोतयेगिरी’; ७ लाख ८५ हजार देणारा रियल इस्टेट एजंट दत्तात्रय शेटेला अटक!

Latest News

कल्पनाची ‘तोतयेगिरी’; ७ लाख ८५ हजार देणारा रियल इस्टेट एजंट दत्तात्रय शेटेला अटक! कल्पनाची ‘तोतयेगिरी’; ७ लाख ८५ हजार देणारा रियल इस्टेट एजंट दत्तात्रय शेटेला अटक!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तोतया आयएएस अधिकारी कल्पना त्र्यंबकराव भागवत (वय ४५, रा. चिनारगार्डन, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) हिच्या...
सेंट्रल नाक्यावर नायलॉन मांजाने चिरला ३ वर्षीय चिमुकल्याचा गळा!
राजनगरमध्ये मध्यरात्री हल्लकल्लोळ! टवाळखोराने जाळल्या ५ दुचाकी!!
हर्सूल टी पॉइंटवर हिट ॲन्ड रन; दुचाकीस्वाराला उडवून कार पसार... 
सराफा व्यापाऱ्यावर ४ टवाळखोरांचा प्राणघातक हल्ला, दारू पिण्यासाठी पैसे मागत लाकडी दांड्याचे वार, व्यापारी जखमी, हडको एन ११ मधील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software