चिकलठाण्याजवळ एटीएसची मोठी कारवाई : २ गावठी कट्टे आणि जीवंत काडतुसांसह दोघांच्या मुसक्या आवळल्या!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चिकलठाण्याजवळ जालना रोडवर दहशतवाद विरोधी पथकाने सोमवारी (१९ जानेवारी) रात्री मोठी कारवाई केली. गावठी कट्टे विकणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे व तीन जिवंत काडतुसे व एक मोटारसायकल असा एकूण १ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

बाबासाहेब रामभाऊ ऊर्फ रामराव मिसाळ (वय ३०, रा. जानेफळ दाभाडी ता. भोकरदन जि. जालना) असे गावठी कट्टे विकणाऱ्याचे आणि रईस खान अजीम खान पठाण (वय ४२, रा. हुसेन कॉलनी, पुंडलिकनगर रोड, छत्रपती संभाजीनगर) अशी गावठी कट्टा खरेदी करणाऱ्याचे नाव आहे. एटीएसचे सहायक पोलीस निरीक्षक दिनकर शिवाजीराव गोरे यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, सोमवारी (१९ जानेवारी) सायंकाळी दिनकर गोरे हे सहकारी पोलीस उपनिरीक्षक मनोहर खंडागळे, सहायक फौजदार विक्रम देशमुख, पोलीस अंमलदार वाल्मीक निकम, संजय घुगे, राजेंद्र डकले, श्रीमंत भालेराव, गणेश कोरडे यांच्यासह  चिकलठाणा ह‌द्दीत लॉजेस तपासत होते.

पोलीस अंमलदार वाल्मीक निकम यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, छत्रपती संभाजीनगर ते जालना रोडने एक व्यक्ती मोटारसायकलवर (क्र. एमएच २० ईक्यू ०५३१) गावठी कट्टा व काडतूस विक्री करण्यास छत्रपती संभाजीनगरकडून जालनाकडे जात आहे. पोलिसांनी लगेचच हिरापूर शिवारातील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या बाजूला सापळा रचला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोटारसायकलवरून संशयित व्यक्ती बाबासाहेब मिसाळ आला. त्याला थांबण्याचा इशारा करून पोलिसांनी मोटारसायकल रोडच्या बाजूला घ्यायला सांगितली. अंगझडतीत त्याच्याकडे ३१ हजार रुपयांचा एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस मिळून आले.

६० हजारांची मोटारसायकल असा एकूण ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी बाबासाहेबची कसून चौकशी केली. त्याने सांगितले, की गेल्या महिन्यात दोन गावठी कट्टे मध्यप्रदेश राज्यातून आणले असून, त्यापैकी एक कट्टा रईस खान पठाण याला विकला आहे.पोलिसांनी लगेचच रईस खान झाल्टाफाटा येथील गुरूसाया डोसा हॉटेलसमोर रात्री साडेअकराला अटक केली. त्याच्याकडील ३२ हजारांचा एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वेरूळची धक्कादायक घटना : लॉजच्या रूममध्ये शिरताच प्रेयसीकडून पैशांसाठी ब्लॅकमेल, पुरुषाने तिच्या समोरच गळफास घेऊन केली आत्‍महत्‍या!

Latest News

वेरूळची धक्कादायक घटना : लॉजच्या रूममध्ये शिरताच प्रेयसीकडून पैशांसाठी ब्लॅकमेल, पुरुषाने तिच्या समोरच गळफास घेऊन केली आत्‍महत्‍या! वेरूळची धक्कादायक घटना : लॉजच्या रूममध्ये शिरताच प्रेयसीकडून पैशांसाठी ब्लॅकमेल, पुरुषाने तिच्या समोरच गळफास घेऊन केली आत्‍महत्‍या!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : प्रेमसंबंध असलेल्या महिलेसोबत लॉजवर गेल्यानंतर तिने ब्लॅकमेल सुरू केल्याने ५१ वर्षीय व्यक्तीने लॉजच्या खोलीतच...
कन्नड हादरले : वंदनाने गुप्तांग दाबून मारले, धीरजने डोक्यात घातले शस्‍त्राचे वार, माजी सरपंचपूत्राच्या हत्‍येचे गूढ उकलले!!
छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी ‘व्हॉइस ऑफ फ्युचर’ सेमिनार!, विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजकांची नोंदणी सुरू...
बिडकीनजवळील जुगार अड्ड्यावर छापा, ‘या’ ७ जणांना पकडले!‌
१६ वर्षीय मुलीला फूस लावून पळवले, छत्रपती संभाजीनगरच्या कुंभेफळची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software