गोमांस तस्करी आता अलिशान कारमधून!; वाळूजमध्ये मोठी कारवाई, अडीच लाखांचे गोमांस जप्त, दोघांना अटक

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मालवाहतुकीची वाहने शक्यतो पोलीस तपासतात. त्यामुळे गोमांस तस्करांनी आता कारमधून गोमांस वाहतूक सुरू केली आहे. वाळूज पोलीस ठाण्यासमोरच ८०० किलो गोमांस घेऊन जाणारी इनोवा कार पकडली. २ लाख ४० हजारांचे गोमांस आणि ५ लाखांची कार असा एकण ७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज, २ डिसेंबरला सकाळी ७ च्या सुमारास करण्यात आली.

हुसेन इब्राहिम तांबोळी व  जिकरान असलम शेख (दोघे रा. ममदापूर ता. राहता जि. अहिल्यानगर) यांना पकडून त्यांच्याविरुद्ध पोलीस अंमलदार कारभारी रावते यांच्या तक्रारीवरून वाळूज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा तिसरा साथीदार नाझीम कुरेशी (रा. ममदापूर ता. राहता जि. अहिल्यानगर) फरारी झाला आहे. कारमध्ये दोन वेगवेगळ्या नंबर प्लेटही मिळाल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, वाळूज पोलिसांना इनोवा कार आणि स्विफ्‍ट गाडीतून गोमांस तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी लिंबेजळगावजवळील टोल नाक्याजवळ थांबून सापळा रचला. मात्र इनोवा कार धक्का देऊन सुसाट पुढे निघून गेली. पोलिसांनी वाळूज पोलीस ठाण्यासमोर ही कार ताब्यात घेतली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप वाघ करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
'वाईट कमेंट वाचून त्यांना फटकारावेसे वाटत होते...; अभिनेत्री नेहा धुपियाची विशेष मुलाखत
Business News : भाजी विक्रेत्याने जिंकली ११ कोटींची पंजाब राज्य लॉटरी, त्याला किती उत्पन्न कर भरावा लागेल?
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software