- News
- सिटी क्राईम
- बाबा पेट्रोलपंप चौकात पोलिसांनी युसूफची काढली धिंड!; थेट वाहतूक पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल...
बाबा पेट्रोलपंप चौकात पोलिसांनी युसूफची काढली धिंड!; थेट वाहतूक पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याने आक्रमक पोलिसांची चौकाचौकात कारवाई, ७९७ रिक्षांना दंड, ३२ रिक्षा जप्त
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बाबा पेट्रोलपंप चौकात वाहतूक पोलीस अंमलदार तुकाराम टाकसाळे यांच्या अंगावर रिक्षा घालणारा गुन्हेगारी प्रवृत्तीचा चालक युसूफ मोहंमद अन्सारी (रा. मोमीनपुरा, दौलताबाद) याला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यानंतर ज्या ठिकाणी त्याने रिक्षा अंगावर घातली, तिथूनच त्याची सोमवारी (२४ नोव्हेंबर) रात्री धिंड काढण्यात आली. त्याला वेदांतनगर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
बाबा पेट्रोलपंप सिग्नलवर असताना पोलीस अंमलदार तुकाराम टाकसाळे सहकाऱ्यांसह तैनात असताना दुपारी १ च्या सुमारास सेशन कोर्टाकडून बाबापेट्रोलपंप सिग्नलवरून रेल्वस्टेशनकडे जाणाऱ्या रोडवर युसूफ रिक्षात (एमएच २० इके ४६३२) प्रवासी भरत होता. त्याने गणवेश परिधान केला नसल्याने टाकसाळे यांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. त्यामुळे संतापलेल्या युसूफने रिक्षा वेगात त्यांच्या अंगावर घातली आणि २० फूट फरपटत नेले. यात टाकसाळे यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर तो रिक्षा घेऊन सुसाट पळून गेला. ही रिक्षा युसूफचा भाऊ मोहम्मद इब्राहिम मोहम्मद अली अन्सारी याची असल्याचे समोर आले. वेदांतनगर पोलिसांनी युसूफ मोहम्मद अली अन्सारी (वय २७) आणि रिक्षामालक मोहम्मद इब्राहिम अली अन्सारी (दोघे रा. मोमीनपुरा मशिदीजवळ, दौलताबाद) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही युसूफने रेल्वेस्थानकाजवळ ११ ऑगस्टला सायंकाळी सहाला कामगार कल्याण कार्यालयातील वर्ग २ च्या अधिकारी असलेल्या महिलेकडे जास्तीचे पैसे मागून शिवीगाळ, धमक्या देत विनयभंग केला होता. त्याला आवरण्यासाठी आलेल्या दोन वाहतूक पोलिसांना त्याने धक्काबुक्की करत त्यांच्या हातातील चालान मशीन फेकून दिले होते. त्यावेळी अटक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जामीन झाला होता. त्यामुळे त्याची हिंमत वाढली होती.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
By City News Desk
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 22:08:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...

