तलवार, चाकूने १७ वार करत युवकाची क्रूरपणे हत्या!, छत्रपती संभाजीनगरचा शहाबाजार हादरला!!, रात्री उशिरा मारेकरी पकडले

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर शहरातील शहाबाजारातील निशांत दर्ग्याचा परिसर शुक्रवारी (३१ ऑक्‍टोबर) सायंकाळी ५.३० वाजता युवकाच्या अत्यंत क्रूर हत्‍येच्या घटनेने हादरला. नशेखोरांच्या टोळक्याने भर रस्त्यावर समीर खान इनायत खान (वय ३०, रा. काचीवाडा, शहाबाजार) यांची तलवार, चाकूने गळा, पोटात तब्बल सतरा वार करत निर्घृण हत्या केली. गेल्या काही दिवसांत शहरात सुरू असलेल्या हत्‍यासत्रात ही अत्‍यंत क्रूर हत्या मानली जात आहे. शहरातील गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना येत असलेले अपयश ठळकपणे समोर आले आहे.

११११

मारेकरी इस्लाम खान खमर खान उर्फ असलम चाऊस (वय २७, रा. शहागंज), मोहम्मद नासिर मोहम्मद फारुख उर्फ इता (वय ३२, रा. रशीदपुरा), इसरार खान निसार खान (वय २३) व शोएब अन्वर खान उर्फ काला (वय २१, दोघे रा. पंचायत समितीमागे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ते एका गोठ्यात लपून बसले होते. पोलीस सूत्रांच्या माहिती समीर शहागंजमध्ये भाजीपाला विकायचा. याच परिसरात फळे, भाजीपाला विकणाऱ्या काहींशी समीरचा वाद सुरू होता. २७ ऑक्टोबरला फळ विक्रेता आसिफ रायडर, हफिज ऊर्फ टकला, शोएब खान यांनी समीरला मारहाणही केली होती. त्यानंतर आसिफने समिरला २८ ऑक्टोबरला कॉल करून खुनाची धमकी दिली होती. तुझे किसी के हाथ से मार दूँगा, तेरा मर्डर करूंगा, असे तो कॉलवर म्हणाला होता. त्यानंतर शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) सायंकाळी ५ वाजता समीर हा मित्र शारेक बाली याच्यासोबत शहाबाजारमध्ये असताना अचानक तोंड बांधलेले चार मारेकरी आले. संकट लक्षात घेऊन समीर पळत सुटला. 

पाठलाग करून भररस्‍त्‍यात केली शरीराची चाळणी...
चौघांनी त्याचा पाठलाग केला आणि भर रस्त्यावर त्याला गाठून तलवार, चाकूचे गळा व पोटावर तब्बल १७ वार करत अक्षरशः त्याच्या शरीराची चाळणी केली. एकाने तर क्रूरपणे त्याचा उजवा पाय गुडघ्यापासून तोडला. त्यानंतर मारेकरी दहशत माजवून पसार झाले. या क्रूर हत्येची माहिती कळताच प्रभारी पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त सागर देशमुख, शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल माने यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. हत्येचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांच्याकडे आहे.

शहाबाजारमध्ये नशेखोरांचा सर्रास वावर
शहाबाजारमध्ये नशेखोरांचा सर्रास वावर असून, ते विक्रेत्यांना धमकावत दहशत माजवत असतात. पोलिसांनी वेळीच नशेखोरांना आळा घातला असता तर ही घटना घडली नसती, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. पोलिसांचा नाकर्तेपणाच या हत्‍येला जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली गेली आहे. हत्‍येला वादाची पार्श्वभूमी असल्याचे समीरच्या पत्नीने पोलिसांना सांगितल्याने पोलिसांनी त्यादृष्टीने तपास करत रात्री ११ पर्यंत मुख्य मारेकरी इस्लाम खानसह त्याचे तिन्ही साथीदार पकडले. ही कामगिरी शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, सुनिल माने, पोलीस उपनिरीक्षक अजित दगडखैर, अर्जुन कदम, संदीप काळे पोलीस अंमलदार दिलीप मोदी, राजेंद्र साळुंके, आनंद वाहुळ यांच्या पथकाने केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software