छत्रपती संभाजीनगरच्या इंटरनॅशनल कॉल सेंटरच्या चौकशीसाठी ४ अधिकाऱ्यांचे विशेष पथक, मास्टरमाइंडला गोव्यातून उचलले!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : चिकलठाणा एमआयडीसीत कनेक्ट इंटरप्रायजेस, टी- ७, एसटीपी १ या चार मजली इमारतीत चालत असलेले अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर सिडको एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी (२८ ऑक्टोबर) उद्‌ध्वस्त केले होते. हा गुन्हा तंत्रज्ञानावर आधारित असल्याने तपासासाठी ४ अधिकाऱ्यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. अमेरिकन नागरिकांना गंडवणाऱ्या या कॉल सेंटरचा मास्टरमाइंड अब्दुल फारूक मुकदम शाह ऊर्फ फारुकी याला बुधवारी (२९ ऑक्टोबर) पोलिसांनी गोव्यातून पकडून आणले, अशी माहिती सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली.

छाप्यात पोलिसांनी ११६ तरुण-तरुणींना पकडले होते. यात एक अल्पवयीन होता. त्यांना न्यायालयात हजर केले असता मुख्य सहा संशयितांना ६ नोव्‍हेंबरपर्यंत पोलीस कोठडी तर उर्वरित १०९ जणांना १९ नोव्‍हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली होती. कॉल सेंटरसाठी इमारत भाड्याने घेण्यासाठी करारनामा करणारा आणि कायम जॉनच्या संपर्कात राहणारा अब्दुल फारूक असल्याचे तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. तो गोव्यात असल्याचे कळताच शहर पोलिसांनी गोवा पोलिसांना कळवले. गोवा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांचे पथक थेट विमानाने गोव्याला जाऊन अब्दुलला घेऊन आले.

कॉल सेंटरमधून जेवढा गंडा घातला जायचा, त्यातील ४५ टक्के वाटा जॉन नावाच्या भामट्याकडे जात होता. उर्वरित ५५ टक्‍क्यांत मुख्य ५ संशयितांचा वाटा असायचा. जॉनच्या संपर्कात फारूकीच राहायचा. फारूकी हा गारखेड्याचा मूळ रहिवासी आहे. मात्र दहा वर्षांपासून तो शहरात राहत नव्हता. शहर पोलिसांनी छाप्यात ७ अलिशान कार, १४६ मोबाइल आणि १०६ लॅपटॉपचा जप्त केले आहेत. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणांना दिल्लीच्या एका व्यक्तीने येऊन प्रशिक्षण दिले होते. आता या व्यक्तीचाही शोध पोलीस घेत आहेत. तो अमेरिकन रिटर्न असल्याचे सांगण्यात येते. जप्त मुद्देमालातून तांत्रिक तपास केला जाणार असून, सायबरच्या तज्‍ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. यातून अनेक गोष्टींचा उलगडा होईल, अशी माहिती प्रभारी पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.

या गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या नेतृत्वात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मोहसिन सय्यद, पोलीस उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंढे, पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के, हवालदार लालखॉ पठाण, पोलीस अंमलदार नितेश सुंदर्डे, छाया लांडगे यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. मुंबई सायबर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरला येऊन या कारवाईची माहिती घेतली. कॉल सेंटरसाठी तरुण-तरुणींची भरती दिल्लीतून झाली होती. अमेरिकेत कायदे कडक आहेत. त्यामुळे नागरिक साधी नोटीसही आली तरी घाबरून जातात. अमेरिकेतील सरकारी कार्यालयांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे कॉल सेंटरमधील नागरिक त्यांना घाबरवून टाकायचे. त्यामुळे त्यातून सुटका करून घेण्यासाठी नागरिक सहज विविध कंपन्याचे गिफ्ट कार्ड देण्यास तयार व्हायचे. 

जामिनासाठी ११४ जणांचे अर्ज
दरम्यान, पोलिसांनी छाप्यात अटक केलेल्या ११४ जणांनी नियमित जामिनासाठी अर्ज केले आहेत. या अर्जावर न्यायालयाने सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे मागवले आहे. दरम्यान, या कॉल सेंटरचा मुख्य संशयित जॉन नावाचा अमेरिकेतील व्यक्ती असल्याचे तपासात आतापर्यंत समोर आले आहे. तो मिळकतीतील ४५ टक्‍के वाटा घ्यायचा. अमेरिकेतील नागरिकांचा डेटा तोच पुरवत होता. जॉन हा खरंच व्यक्ती आहे, की आभासी व्यक्ती आहे, हेही अद्याप निष्पन्न झालेले नाही. याआधीची बातमी : छत्रपती संभाजीनगरात अवैध इंटरनॅशनल कॉल सेंटरवरील कारवाईची FULL  STORY : कसा करायचे संपर्क, कसे दाखवायचे भीती, लुटण्याची कशी होती पद्धत अन्‌ लुटीची विभागणी जाणून घेऊ सर्व... - Chhatrapati Sambhaji Nagar City News

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Latest News

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधवा महिलेचे डोक्याचे केस धरून ओढत, धक्काबुक्की करून युवकाने तिची सोन्याची पोत घेऊन पळ...
कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software