वाळूज MIDC त गोमांस वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकाला गोरक्षकांनी चोपले!; तासभर रास्ता रोको

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : आंबेलोहळ येथून ११० किलो गोमांस घेऊन जाणारी ऑटोरिक्षा आज, ४ डिसेंबरला सकाळी पावणेनऊच्या सुमारास वाळूज एमआयडीसीतील विटावा फाट्याजवळ जोगेश्वरी रस्‍त्‍यावर गोरक्षकांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. चालकाने हुलकावणी देत रिक्षा वेगाने पुढे नेली. गोरक्षकांनी पाठलाग करून रिक्षा अडवून चालकाला चोप दिला. पोलिसांना कळवल्यानंतर तब्बल तासभराने पोलीस आले.

वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातील अंमलदार योगेश गुमलाडू यांच्या तक्रारीवरून रिक्षाचालक हबीब हशम शेख (वय ३८), रिक्षात बसलेली महिला कमरूबी जलाल सय्यद (वय ६०, दोघे रा. आंबेलोहळ ता.गंगापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज, ५ डिसेंबरला सकाळी पावणेनऊच्या सुमारास पोलिसांना एका गोरक्षकाने कॉल करून सांगितले, की वाळूज एमआयडीसीतील विटावा फाट्याजवळ जोगेश्वरीकडे जाणाऱ्या रस्‍त्‍यावर एका ऑटोरिक्षातून गोवंश मास वाहतूक होत आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहायक पोलीस निरीक्षक संजय गित्ते, सहायक पोलीस निरीक्षक अरविंद गित्ते, विशेष शाखेचे पोलीस अंमलदार नीलेश पाटील, राजाभाऊ कोल्हे, बाळासाहेब आंधळे, जालिंदर रंधे आदींनी साडेदहाला घटनास्थळी धाव घेतली. तिथे गोरक्षकांचा जमाव जमला होता. रस्त्याच्या बाजूला लावलेल्या ऑटो रिक्षात (क्र. एमएच २० ईएफ ७०२३) गोवंशाचे मांस दिसून आले. रस्‍त्‍यावर सुद्धा गोवंश मांस दिसले. रिक्षाच्या काचा फुटलेल्या दिसल्या. रिक्षाचालक हबीब आणि कमरूबी यांना गोरक्षकांनी पकडून ठेवले होते. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी ३३ हजार रुपयांचे ११० किलो मांस आणि २ लाख रुपयांची रिक्षा, ४ सुरे जप्त केले. 

गोरक्षक आक्रमक...
गोरक्षकांनी आंबेलोहळ येथील कत्तलखान्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत रस्ता मोकळा करणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको सुरू केला होता. त्यामुळे तणाव वाढला. पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी गोमांस विक्री, वाहतूक व कत्तलखान्यांवर कारवाई सुरू केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर गोरक्षकांनी रास्ता रोको मागे घेतला. या वेळी गोरक्षक गणेश शेळके, शंकर सूर्यवंशी, अमित सिंग, अभिषेक माने, देवा राणे, धोंडिबा मोठे, रविकुमार पाटील, विवेक मोठे, आकाश मेटे, सूरज जाधव, रोहित पाटील, सुरेश काबरा, ओम घोडके, कडूबाळ पटेकर, रवि पाठे, शुभम पडघण, शुभम पवार, तुषार घिके, अक्षय बोडखे आदींचा आंदोलनात सहभाग होता.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना

Latest News

Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुपारचे जेवण करत बसलेल्या कामगारांसाठी सुसाट कंटेनर काळ बनला. सर्व्हिस ट्रक, जेसीबी उभा करून...
Update : तलावात पोहत असताना दोन मुलांचा बुडून मृत्‍यू, हर्सूल सावंगीजवळील नायगावची दुर्दैवी घटना, दोन्ही मुले बायजीपुऱ्याचे!
धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना
३८ वर्षीय महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, वाळूज MIDC तील घटना
Update : तलावात पोहत असताना दोन मुलांचा बुडून मृत्‍यू, हर्सूल सावंगीजवळील नायगावची दुर्दैवी घटना, दोन्ही मुले बायजीपुऱ्याचे!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software