मोत्याच्या खड्यावरून दोघांची जाधववाडीत मजुराला बेदम मारहाण

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : अंगठीतील मोत्याच्या खड्यावरून दोघांनी जाधवमंडीतील मजुराला बेदम मारहाण करत जखमी केले. ही घटना रविवारी (२८ डिसेंबर) सकाळी १० च्या सुमारास जाधववाडीत घडली.

शेख सादीक शेख हबीब (वय ३७, रा. मिसारवाडी कादरिया कॉलनी छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते जाधववाडीत मजुरी करतात. रविवारी सकाळी १० च्या सुमारास ते जाधववाडीतील जाधवमंडीत असताना ओळखीचे शेख रफीक (रा. मिसारवाडी गल्ली नं. २), अबुजर खान (रा. मिसारवाडी) त्यांच्याकडे आले. सादिक यांच्या अंगठीतील हरवलेला मोत्याचा खडा त्यांच्याकडे दिसला. सादिक यांनी त्याबाबत त्यांना विचारले.

तुम्हाला माझ्या अंगठीतील मोत्याचा खडा कोठे भेटला. हा माझा आहे. त्यावर ते म्हणाले, की हा खडा आमचा आहे. यावरून सादिक यांना शिवीगाळ करत त्यांनी हाताचापटाने मारहाण केली. अबुजर याने सादिक यांना पकडले व लाकडी दांड्याने शेख रफीक याने कमरेवर, पाठीवर मारून जखमी करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पळून गेले. जखमी झालेल्या सादिक यांनी सिडको पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी शेख रफिक व अबुजर खानविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास विद्या राठोड करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश

Latest News

लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लाचखोर तत्कालीन पोलीस अंमलदार यमाजी लक्ष्मण खटाणे (रा. रेणुकानगर, गारखेडा परिसर) याला शुक्रवारी (६...
८० वर्षांच्या वृद्धेवर ५४ वर्षांच्या पुरुषाचा लैंगिक अत्याचार, सोयगावची खळबळजनक घटना
Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
Update : तलावात पोहत असताना दोन मुलांचा बुडून मृत्‍यू, हर्सूल सावंगीजवळील नायगावची दुर्दैवी घटना, दोन्ही मुले बायजीपुऱ्याचे!
धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software