भल्या पहाटे बेगमपुऱ्यात चाकूधारी टवाळखोराने केला कहर!, दोघे जखमी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगरात टवाळखोरांनी अक्षरशः कहर केला आहे. आधी पोलीस भरतीच्या सरावासाठी जाणाऱ्या तरुणांना अडवून कॉलर पकडत पैसे मागितले. नंतर एका खोलीत घुसून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा तरुण आणि तरुणाच्या नातेवाइकावर चाकू हल्ला केला. यात तरुण आणि त्याचा नातेवाइक दोघेही जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (७ नोव्‍हेंबर) पहाटे साडेचारच्या सुमारास बेगमपुऱ्यातील साई मंदिरासमोर घडली. बेगमपुरा पोलिसांनी हल्लेखोर तरुणाला अटक केली आहे.

कृष्णा वसंत तायडे (वय ३१, रा. पांगरी ता. सिल्लोड, ह. मु. नागेश ताराचंद जावळे यांच्या घरात किरायाने साई मंदिरासमोर बेगमपुरा, छत्रपती संभाजीनगर) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो मित्रासोबत राहतो आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. त्याच्यासोबत अमर भोटकर, सुरज पाडळे असे मित्र एकत्र राहतात. कृष्णाचे नातेवाइक डॉ. रमेश सुखदेव दांडगे (वय ३८, रा. सुरंगळी ता. भोकरदन, जि. जालना) हे गुरुवारी (६ नोव्‍हेंबर) रोजी त्यांच्या कामानिमित्त छत्रपती संभाजीनगरला आले होते व कृष्णाच्या रूमवरच थांबले होते.

रात्री जेवण करून ११ च्या सुमारास खोलीत सर्व जण झोपी गेले. शुक्रवारी (७ नोव्‍हेंबर) पहाटे चारला पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी दोन्ही रूममेट अमर भोटकर, सुरज पाडळे ग्राऊंडवर निघून गेले. त्यानंतर कृष्णा झोपी गेला. त्यानंतर पुन्हा घराची कडी वाजली. त्यामुळे कृष्णाने उठून पाहिले असता पहाटेचे साडेचार वाजले होते. त्याला वाटले, की रूममेट परत आले असतील. त्यामुळे कृष्णाने रूमचा दरवाजा उघडला असता एक अनोळखी तरुण समोर दिसला. तो म्हणाला, की, रवींद्र चव्हाण कोठे आहे? त्यावर कृष्णाने सांगितले, की तो रूम सोडून निघून गेला आहे. तो आता येथे राहत नाही. त्यावर तो तरुण संतापाने पुन्हा पुन्हा त्याच्याबद्दल विचारत असल्याने कृष्णाने त्याला सांगितले, की तू घरमालकासोबत बोलून माहिती घे.

त्याचवेळी कृष्णाचे नातेवाइक डॉ. रमेश दांडगे यांनी त्यांचा मोबाइल फोन काढून रूममालकाला फोन करत असताना त्या तरुणाने त्याच्याजवळील चाकूने तू कोणाला फोन लावतोस थांब, तुझी विकेटच टाकतो, असे म्हणून डॉ. दांडगे यांच्या डाव्या हाताच्या दंडावर चाकू मारून जखमी केले. कृष्णाने त्याला रोखले असता त्याने कृष्णाच्या पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला. कृष्णाने वार चुकवण्यासाठी हाताने वार अडवला. त्यानंतर कृष्णा व डॉ. दांडगे यांनी त्याच्या हातातील चाकू हिसकावला. यात कृष्णाच्या उजव्या हाताला जखम झाली. त्यानंतर काही वेळाने ग्राऊड प्रॅक्टिससाठी गेलेले अमर भोटकर व सुरज पाडळे हेदेखील घरी आले.

त्यांनी त्या तरुणाला बघितल्यानंतर सांगितले, की या मुलाने आम्हाला रस्त्यात अडवून माझी कॉलर पकडून पैसे मागत होता. त्यानंतर डॉ. दांडगे यांनी डायल ११२ वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेचच घटनास्‍थळी येऊन त्या मुलाला ताब्यात घेतले. त्याचे नाव पोलीस चौकशीत समोर आले. वेदांत गणेश अभंग (रा. राममंडप जवळ मिटमिटा छत्रपती संभाजीनगर) असे या हल्लेखोर तरुणाचे नाव असल्याचे कळाले. त्याच्याविरुद्ध  बेगमपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कोळेकर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software