सुसाट कारच्या धडकेने प्रसिद्ध माने दाम्पत्याचा मृत्यू, पडेगावची भीषण दुर्घटना, नातेवाइकांचे सांत्वन करून परतत होते...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : भरधाव कारने पायी जात असलेल्या दाम्पत्याला जोरदार धडक दिली. यात दोघांचाही मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी (२५ ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर शहरातील पडेगावच्या आर्चआंगणसमोर घडली. प्रा. डॉ. रामराव माने (वय ७१) व त्यांच्या पत्नी विधिज्ञ अॅड. रत्नमाला साळुंके-माने (वय ६४) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

माने हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. हे दाम्पत्य नंदनवन कॉलनीत राहत होते. त्यांचे पडेगावच्या देशमुखनगरमध्येही देखील घर आहे. काही दिवसांपूर्वी आर्चआंगण परिसरातील एका नातेवाईकाचे निधन झाले होते. शोकाकूल कुटुंबीयांना भेटण्यासाठी माने दाम्पत्य शनिवारी सायंकाळी आले होते. कुटुंबीयांना भेटून दोघे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पडेगावच्या रस्त्यावर आले. देशमुखनगरकडे जाण्यासाठी दोघेही एकमेकांचा हात पकडून रस्ता ओलांडत असतानाच नगर नाक्याकडे सुसाट निघालेल्या पांढऱ्या कारने त्यांना उडवले. दोघेही दूरवर फेकले गेले. डोके, छातीला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आज सायंकाळी साडेचारला अंत्यसंस्कार
माने दाम्पत्यावर आज, २६ ऑक्टोबरला सायंकाळी साडेचारला धाराशिव जिल्ह्यातील त्यांच्या मूळगावी रुईभर येथे अंत्यसंस्कार होतील. तीन दशकांहून अधिक काळ अॅड. रत्नमाला साळुंके-माने यांनी हायकोर्टात वकिली केली असून, या दाम्पत्याला अपत्य नव्हते. मात्र त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना पाल्यासारखे जपले. अनेक विद्यार्थ्यांच्या मदतीला अडचणीच्या काळात धावून गेले. त्यांनी घडवलेले शेकडो विद्यार्थी आज आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधक म्हणून कार्यरत आहेत. अनेक राष्ट्रीय, स्थानिक नामांकित वृत्तपत्रांत त्यांनी लिखाणही केले. डॉ. माने देशभरातील नामांकित संशोधकांपैकी एक होते. त्यांच्या नावावर अनेक पेटंट आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software