- News
- सिटी क्राईम
- छत्रपती संभाजीनगरमध्ये ३२ वर्षीय युवतीवर तिघांचा सामूहिक बलात्कार!; रेल्वेस्टेशन परिसरातील हॉटेलमध्य...
छत्रपती संभाजीनगरमध्ये ३२ वर्षीय युवतीवर तिघांचा सामूहिक बलात्कार!; रेल्वेस्टेशन परिसरातील हॉटेलमध्ये आळीपाळीने तोडले लचके...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हॉटेलमध्ये मित्राला भेटण्यास गेलेल्या तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी (१८ डिसेंबर) पहाटे रेल्वेस्थानक परिसरातील ग्रेट पंजाब हॉटेलमध्ये ही धक्कादायक घटना घडली. वेदांतनगर पोलिसांनी तिन्ही नराधमांना अटक केली आहे. ऋषिकेश तुळशीराम चव्हाण (वय २५), घनश्याम भाऊलाल राठोड (वय २७, दोघे रा. न्यू शांतीनिकेतन कॉलनी, जवाहर कॉलनी परिसर), किरण लक्ष्मण राठोड (वय २६, रा. भानुदासनगर, जवाहर कॉलनी परिसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तिघांना २२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश ए.आर. उबाळे यांनी शुक्रवार (१९ डिसेंबर) दिले.
तक्रारदार ३२ वर्षीय युवती विवाहित असून, ती पती, मुलासह शहरात राहते. तिचा पती खासगी कंपनीत नोकरी करतो. ती शहरातील एका खासगी रुग्णालयात नर्सची नोकरी करते. काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत असल्याने तिने तिच्या भोकरदनमधील एका मित्राला पैसे मागितले होते. दोघांचे बुधवारी रात्री रेल्वेस्टेशन परिसरात भेटण्याचे ठरले. भेटल्यानंतर त्यांनी सोबत बिअर पिण्याचे ठरवले. त्यासाठी तिच्या मित्राने जवळीलच ग्रेट पंजाब हॉटेलमध्ये १०५ क्रमांकाची रूम बुक केली. रूममध्ये युवती व तिच्या मित्राने सोबत बिअर पिली आणि जेवण केले. मात्र, नशेच्या अमलाखाली जाऊन तिचा मित्र झोपी गेला. रात्री ११ ला युवती फोनवर बोलत बाहेर आली. परत खोलीत जाताना ती १०५ ऐवजी चुकून २०५ क्रमांकाच्या रूममध्ये शिरली. त्या रूममध्ये नराधम ऋषिकेश, घनश्याम व किरण दारू पित बसले होते. आपण चुकीच्या रूममध्ये आल्याचे लक्षात आल्याने युवतीने तत्काळ बाहेर जाण्याचा प्रयत्न केला असता नराधमांनी तिला ओढले. बळजबरीने बिअर पाजत तिच्यावर तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला.
बलात्कार केल्यानंतर तिघेही हॉटेलमधून पसार झाले. पहाटे ५ ला शुद्ध आल्यानंतर युवतीला आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची जाणीव झाली. तिने वेदांतनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशावरून तिघा नराधमांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस आयुक्त सागर देशमुख, पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांनीही तातडीने पोलीस ठाणे गाठत पोलीस उपनिरीक्षक संगीता गिरी, अंमलदार रणजित सुलाने, मनोज चव्हाण, प्रवीण मुळे यांना तपासाच्या सूचना केल्या. नराधमांचा शोध घेत असताना सायंकाळपर्यंत तिघांच्या मुसक्या जिन्सी, मोंढा नाका आणि भानुदासनगरातून आवळण्यात आल्या.
तिघेही फायनान्स कंपनीसाठी रिकव्हरीचे काम करतात. बुधवारी रात्री त्यांनी हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी रूम बुक केली होती. रूम घेण्यासाठी एकाचा क्रमांक दिला होता. पोलिसांनी त्या क्रमांकावरून तिघांचा शोध लावला. मैत्रिणीवर सामूहिक बलात्कार होऊनही तिच्या मित्राला सकाळपर्यंत शुद्ध नव्हती. युवतीच्या पतीला घटनेची माहिती मिळाल्यानंतर तोही सकाळी पोलीस ठाण्यात आला. पत्नी अशी मित्राला भेटायला गेलेली, त्यानंतर त्याच्यासोबत हॉटेलमध्ये बिअर पिली हे त्याला कळल्यानंतर तो प्रचंड अस्वस्थ झाल्याचे सूत्रांनी सांगितले. तिन्ही नराधमांना आज, १९ डिसेंबरला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
कावीळ सदृश आजाराने चिमुकलीचा मृत्यू, सिल्लोड तालुक्यातील दुर्दैवी घटना
By City News Desk
घरात आग लागून ६ जण होरपळले, दशमेशनगरातील घटना
By City News Desk
बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By City News Desk
Latest News
05 Mar 2026 16:09:17
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोड शहरातील माऊलीनगर भागातील गव्हाच्या शेतात मंगळवारी (३ मार्च) सकाळी ९ च्या सुमारास क्रूर मातेने...

