क्रांती चौकातील कॅफेत प्रशिक्षणार्थी PSI कडून २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार!, छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहरातील सायबर कॅफेत लैंगिक अत्याचाराची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. एका प्रशिक्षणार्थी फौजदाराविरुद्ध लैंगिक अत्याचारासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा क्रांती चौक पोलिसांनी दाखल केला असून, त्याने क्रांती चौकातील एका कॅफेत २५ वर्षीय तरुणीसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवून गर्भवती केल्याचा आरोप आहे.

भागवत ज्ञानोबा मुलगीर (रा. महातपुरी, ता. गंगाखेड,जि. परभणी) असे संशयिताचे नाव असून, तो सध्या नाशिक अकादमीत पोलीस उपनिरीक्षकाचे प्रशिक्षण घेत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात त्याची बहीण व वडिलांनाही सहआरोपी करण्यात आले आहे. कारण त्यांनी पीडित तरुणी आणि तिच्या मैत्रिणींना धमकावले.
काय आहे नेमका प्रकार...
पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, भागवत आणि तरुणी काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगरात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. याचदरम्यान एकाच जिल्ह्यातील असल्याने त्यांची ओळख झाली. ओळखीतून मैत्री आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. २४ फेब्रुवारी २०२४ रोजी भागवतने तिला क्रांती चौकातील कॅफेत नेले. तिथे त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून तरुणी गर्भवती राहिलेल्या भागवतने गर्भपातासाठी तिला धमकावले.

जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करत खासगी छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत तिला गर्भपाताच्या गोळ्या खायला दिल्या. अलीकडच्या काळात पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर भागवतने तिच्यासोबत ब्रेकअप केले आणि तिला ब्लॉक केले. तरुणीने त्याची बहीण व वडिलांना भागवतशी असलेल्या प्रेमसंबंधाबद्दल सांगितले असता त्यांनीही तुला जे करायचे ते कर, असे म्हणत धमकावले. त्यानंतर तरुणीने क्रांती चौक पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

शहरातील कॅफे पुन्हा चर्चेत... 
कॅफेत लैंगिक चाळे, अत्याचारांचे प्रकार वाढल्याने पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी कॅफेंविरुद्ध मोठी मोहीम राबवली होती. यात अनेक कॅफेंमध्ये जोडप्यांची केलेली व्यवस्था पाहून सारेच चक्रावले होते. काही तासांसाठी कॅफे अगदी जोडप्यांसाठी लॉजमध्ये परावर्तीत होतात, हे दिसून आल्यानंतर कॅफेंविरुद्ध कारवाईसुद्धा करण्यात आली होती. नंतर ही मोहीम थंडावली तशी कॅफेचालक पुन्हा पूर्वपदावर आले आणि कॅफेंमध्ये अश्लील चाळ्यांचा ऊत सुरू झाला. यातूनच ही बलात्काराची घटनाही समोर आल्याने पुन्हा कॅफेंमधील गैरप्रकाराचा मुद्दा चर्चेत आला आहे. दरम्यान, सोमवारी (१७ नोव्हेंबर) सहायक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांनी घटनास्थळी पंचनामा केला. पोलिसांकडून भागवतचा शोध सुरू आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software