नवीन मोबाइलसाठी १५ वर्षीय मुलाने सोडले घर, पैसे नसल्याने आईने दिला होता नकार, हर्सूलची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १५ वर्षीय मुलाने आईकडे नवीन मोबाइलसाठी हट्ट धरला. मात्र पैसे नसल्याने आईने नकार दिला. त्यामुळे रागात मुलाने घर सोडले. त्याच्या अपहरणाची तक्रार त्याच्या आईने हर्सूल पोलीस ठाण्यात शुक्रवारी (१२ डिसेंबर) केली आहे. ही घटना बुधवारी (१० डिसेंबर) दुपारी हर्सूलच्या मोरया पार्क भागात घडली.

धुणीभांडी करणाऱ्या महिलेला दोन मुले असून, बुधवारी सकाळी साडेदहाला त्यांच्या १५ वर्षीय मुलाने मला नवीन मोबाइल पाहिजे, असा हट्ट धरला. महिलेने पैसे नाहीत, असे सांगत नकार दिला. त्यानंतर दुपारी २ ला महिला कामावर निघून गेली. संध्याकाळी सातला त्या घरी आल्या असता मुलगा घरी दिसून आला नाही. त्यांनी व त्यांच्या मोठ्या मुलाने त्याचा परिसरात, नातेवाइकांकडे शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. अखेर त्याच्या अपहरणाची तक्रार पोलिसांत करण्यात आली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलाचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश केदार करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!

Latest News

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ! वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमआयडीसी पथकाच्या विशेष पाहणीत आज, १७ मार्चला एका बंद कंपनीत घरगुती गॅस सिलिंडर्सचा मोठा...
सिल्लोडच्या सुसाट पिकअप वाहनाने स्कुटीस्वार डॉक्टरांना उडवले, जागीच मृत्यू, पालोदवर शोककळा!!
कांचनवाडीत तलवारीने दहशत माजवणाऱ्या युवकावर पोलिसांनी घातली झडप!, व्हॉट्‌स ॲप चॅटिंगमध्ये झाला धक्कादायक उलगडा...
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय : स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन सुविधा बंधनकारक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आदेश
पैठण शहरातील १९ वर्षीय युवती, २५ वर्षीय विवाहिता बेपत्ता!; माहिती कळविण्याचे आवाहन
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software