छत्रपती संभाजीनगर शहरात भीषण अपघात : मोपेड स्लीप होऊन पती-लेक एका बाजूला पडले, दुसऱ्या बाजूला पडलेल्या पत्नीवरून १० टायरी ट्रक गेला..., पत्नीचा जागीच मृत्यू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : ५ वर्षांच्या चिमुकलीसह पती-पत्नी मोपेडवरून एकोड पाचोड गावी परतत होते. त्यांची मोपेड घसरून तिघे पडले. त्याचवेळी मागून आलेल्या भरधाव १० टायरी ट्रकने त्यांना चिरडले. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील देवळाई चौकाजवळ शुक्रवारी (७ नोव्‍हेंबर) सायंकाळी ७ च्या सुमारास घडली.

प्रीती शिवाजी बोंगाने (वय ३०, रा. एकोड पाचोड, ता. छत्रपती संभाजीनगर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून, त्यांचे पती शिवाजी रामनाथ बोंगाने आणि मुलगी श्रावणी ऊर्फ परी हे दोघेही जखमी झाले आहेत. प्रीती या गांधेली परिसरातील खासगी रुग्णालयात कामाला आहेत. काम आटोपल्यानंतर पतीसोबत त्या मोपेडने घरी जात होत्या. सोबत ५ वर्षांची श्रावणीही होती. रेणुकामाता कमानीपासून ते सोलापूर-धुळे महामार्गावर गेले. देवळाई चौकाच्या परिसरात रस्त्याचे काम सुरू असून, त्या ठिकाणी मोपेड घसरली. यात बाप-लेक एका बाजूला तर प्रीता या दुसऱ्या बाजूला पडल्या. त्याच वेळी दहा टायरच्या भरधाव ट्रकचे टायर प्रीती यांच्या अंगावरून गेले.

त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर नागरिकांनी गर्दी केली. सातारा व चिकलठाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून संथगतीने सुरू असून, त्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप करत नागरिकांनी धुळे-सोलापूर महामार्ग दोन्ही बाजूंनी रोखून धरत आंदोलन सुरू केले. कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मृतदेह घटनास्थळावरून हलविण्यास नकार दिला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक २ तासांहू अधिक काळ खोळंबली. पाच कि. मी. पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. पोलिसांनी कंत्राटदारावर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह हलविण्यात आला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये टवाळखोराचा राडा, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवाशाला लुटले!; सिडको बसस्थानकाजवळील घटना

Latest News

ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये टवाळखोराचा राडा, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवाशाला लुटले!; सिडको बसस्थानकाजवळील घटना ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये टवाळखोराचा राडा, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवाशाला लुटले!; सिडको बसस्थानकाजवळील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : टवाळखोराने हद्दच केली. थेट ट्रॅव्हल्सच्या ऑफीसमध्ये घुसून तिकीट काढायला आलेल्या प्रवाशाचा मोबाइल हिसकावून चाकू...
सिल्लोडमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला एसटी बसने उडवले, तरुणाचा जागीच मृत्यू
हलगर्जीपणाचा कळस : अचानक नदीपात्रात धरणातून पाणी सोडल्याने शेतकरी गायीसह गेला वाहून!; वैजापूर तालुक्यातील धक्कादायक घटना
पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर...
एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software