BSNL च्या केबलने दुचाकीस्वार तरुणाचा गळा चिरला!; कलाग्रामसमोरील घटना, कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : कोणताही सूचनाफलक न लावता किंवा अपघात होऊ नये म्हणून काळजी न घेता, अत्‍यंत हलगर्जीपणाने बीएसएनएलचे केबल टाकणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी (१२ सप्‍टेंबर) गुन्हा दाखल केला आहे. केबलमुळे २१ वर्षीय तरुणाचा गळा चिरला जाऊन तो गंभीर जखमी झाल्याची घटना कलाग्रामसमोर घडली.

सुमित सुनिल बनकर (वय २१, रा. एकतानगर, हर्सूल जटवाडा रोड, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो आईसोबत राहतो. त्याची आई कपडे शिवण्याचे काम करते. शुक्रवारी (१२ सप्‍टेंबर) दुपारी १२ च्या सुमारास सुमित त्याचे मामा मनोज साबळे (रा. शहानगर मसनतपूर चिकलठाणा) यांच्याकडे मित्राच्या मोटारसायकलीने निघाला होता. कलाग्रामसमोरील रोडने शहानगरकडे येत असताना रस्त्यात अचानक एक केबल त्याच्या गळ्याला घासला. सुमित जखमी झाला. त्याने लगेचच मोटारसायकलीला ब्रेक लावल्याने पडण्यापासून वाचला. त्याने आजूबाजूला बघितले असता तेथे एक व्यक्‍ती झालेला प्रकार बघून लपला. मात्र तो सुमितकडे आला नाही.

त्यानंतर सुमितने त्याचा मित्र प्रेम मगरे याला फोन करून तेथे बोलावले. प्रेम आला व त्याने सुमितला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे सुमितचा मामा मनोज साबळे हेही आले. सुमितने त्यांना घडलेली घटना सांगितल्याने त्यांनी त्या ठिकाणी जाऊन विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की तेथे बीएसएनएल कंपनीकडून केबलचे काम चालू असून रवि प्रकाश गायकवाड हा तेथे केबलचे काम करत होता. त्याने तेथे काम करत असल्याचा कोणताही सूचनाफलक न लावता निष्काळजीपणाने काम करत होता. पोलिसांनी कंत्राटदार गायकवाडविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार पंडित चव्हाण करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश

Latest News

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...
भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना
सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software