अवैध इंटरनॅशनल कॉल सेंटरचा मास्टरमाइंड निघाला २२ वर्षांचा तरुण!; फारूकीने तोंड उघडले, म्हणाला, तुम्ही पहिल्या दिवशी कर्मचारी म्हणून पकडला तोच तो ‘राजवीर’

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : चिकलठाणा एमआयडीसीतील आयटी पार्कमध्ये आयआरएस इंटर्नल रेव्हेन्यू सर्व्हिस इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट नावाने अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर चालवणाऱ्या टोळीचा म्होरक्या अवघ्या २२ वर्षांचा निघाला. राजवीर प्रदीप वर्मा (रा. वल्लभनगर, अहमदाबाद) असे त्याचे नाव समोर आले असून, मुख्य संशयितांपैकी एक असलेल्या अब्दुल फारुक मुकदम शाह ऊर्फ फारुकी याच्या कसून चौकशीत राजवीरचे नाव समोर आले आहे. विशेष म्हणजे, पहिल्याच दिवशी अटकेतील ११४ कर्मचाऱ्यांमध्ये तोही एक कर्मचारी बनून न्यायालयीन कोठडीत हर्सूलच्या तुरुंगात गेला होता. त्यानंतर जामिनासाठीही प्रयत्न सुरू केले होते. मात्र फारूकीने त्याचे बिंग फोडले.

अमेरिकेत शेकडो कॉल करून तिथल्या नागरिकांना करचुकवल्याबद्दल धमकावून किंवा वेगवेगळ्या योजनांची आमिषे दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा कॉल सेंटरमधून घातला जायचा. या प्रकरणात अटक केलेल्या मुख्य संशयितांत भावेश चौधरी, भाविक पटेल, सतीश लाडे, वलय व्यास, अजय ठाकूर, मनवर्धन राठोड, अब्दुल फारुक मुकदम शाह ऊर्फ फारुकी यांची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. मात्र मुख्य सूत्रधार कोण आहे, हे सांगायला कुणीच तयार नव्हते. पोलिसांच्या पाहुणचारात फारूकी कमजोर खेळाडू सिद्ध झाला. त्याने तोंड उघडले. त्याने राजवीरच बॉस असल्याचे सांगितल्याने शनिवारी (१ नोव्हेंबर) पोलीस निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांनी राजवीरला हर्सूल कारागृहातून ताब्यात घेतले.

दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. विशेष म्हणजे, राजवीरला अटक होताच गुजरातहून तीन वकील त्याच्या जामिनासाठी शहरात आले होते. त्याच्या कुटुंबाचे विविध व्यवसाय असून, त्यात प्रामुख्याने आयात-निर्यातीचा व्यवसाय आहे. राजवीर पदवीधर आहे. त्याचे कुटुंब मूळचे पंजाबचे आहे. मात्र अनेक वर्षांपासून गुजरातमध्ये स्थायिक आहे. कॉल सेंटरमधून होणाऱ्या लुटीचा ४५ टक्‍के भागीदार असलेल्या जॉन नामक ओळख धारण करून असलेल्या व्यक्तीने राजवीरचा काका बलवीर वर्मा याला छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉल सेंटर सुरू करण्याचा सल्ला दिला होता.

त्यानुसार बलवीरने फारूकीच्या मदतीने हे कॉल सेंटर छत्रपती संभाजीनगरात सुरू केले होते. अवैध इंटरनॅशनल कॉल सेंटर सुरू करण्यासाठी राजवीरनेच १५ ते २० कोटींची गुंतवणूक केली होती. अमेरिकन नागरिकांना गंडविण्यासोबतच त्याच्या विविध कंपन्यांतील पैसेही तो याच कॉल सेंटरमधून फिरवून ‘ब्लॅक'चे ‘व्हाईट' करत होता. जेव्हा पोलिसांनी सायबर भामटे राहत असलेल्या सिंधी कॉलनीतील बंगल्याची झडती घेतली, तेव्हाही राजवीरच्या लॅपटॉपमध्ये अमेरिकन प्रशासकीय अधिकाऱ्यांचे बनावट ओळखपत्र, न्यायालयीन आदेशांची बनावट कागदपत्रे, अमेरिकन नागरिकांची नावे व डेटा मिळून आला होता. मोहाली, नंतर रायपूर आणि मग छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी कॉल सेंटर सुरू केले होते.  

सध्या पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त मनोज पगारे, पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्याकडून सर्व संशयितांची कसून चौकशी केली जात आहे. राजवीर आणि त्याची टोळी अमेरिकन नागरिकांना गंडविण्यासाठी युरोपियन टुटानोता ई मेल सेवा व टॉर ब्राऊजरचा वापर करत होते. टुटानोता ही जर्मन कंपनी आहे. ती अत्यंत सुरक्षित आणि गोपनीय ई-मेल सेवा म्हटली जाते. यात युझरचा डेटा ट्रॅक केला जात नाही. जाहिरातीही दाखवल्या जात नाही. डेटा सुरक्षित ठेवण्याचे कठोर नियम पाळते. युरोपियन युनियनच्या कायद्यानुसार चालते. याचा फायदा या भामट्यांना झाला. दरम्यान, मुख्य संशयितांपैकी असलेला सतीश लाडे हा अवघा १२ वी पास असल्याचे समोर आले असून, तसे असूनही तो कॉल सेंटरची हार्डवेअर व नेटवर्किंगची जबाबदारी अत्यंत हुशारीने हाताळत होता. त्याने उच्‍च प्रतीच्या नेटवर्किंग केबल्स, मोडेम यासाठी वापरले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ऑर्केस्ट्रामध्ये काम, खासगी कंपनीत नोकरी... आयुष्याशी संघर्ष हरला २९ वर्षीय तरुण!; चौका घाटात घेतला गळफास, पैठण, वैजापूर तालुक्यातही मजूर, शेतकऱ्याची आत्महत्या

Latest News

ऑर्केस्ट्रामध्ये काम, खासगी कंपनीत नोकरी... आयुष्याशी संघर्ष हरला २९ वर्षीय तरुण!; चौका घाटात घेतला गळफास, पैठण, वैजापूर तालुक्यातही मजूर, शेतकऱ्याची आत्महत्या ऑर्केस्ट्रामध्ये काम, खासगी कंपनीत नोकरी... आयुष्याशी संघर्ष हरला २९ वर्षीय तरुण!; चौका घाटात घेतला गळफास, पैठण, वैजापूर तालुक्यातही मजूर, शेतकऱ्याची आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर/पैठण/वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ऑर्केस्ट्रामध्ये काम करण्यासोबतच गरवारे कंपनीतही नोकरी करणाऱ्या २९ वर्षीय तरुणाने छत्रपती संभाजीगर शहराजवळील चौका...
लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश
८० वर्षांच्या वृद्धेवर ५४ वर्षांच्या पुरुषाचा लैंगिक अत्याचार, सोयगावची खळबळजनक घटना
Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
Update : तलावात पोहत असताना दोन मुलांचा बुडून मृत्‍यू, हर्सूल सावंगीजवळील नायगावची दुर्दैवी घटना, दोन्ही मुले बायजीपुऱ्याचे!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software