२५ वर्षीय विवाहितेने पती, सासरच्यांविरुद्ध तक्रार करताना पोलिसांत नणंदेबद्दल केला धक्कादायक खुलासा!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : २५ वर्षीय विवाहितेने पती व सासरच्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार करताना धक्कादायक खुलासा केला आहे. फ्‍लॅट घेण्यासाठी माहेरावरून १५ लाख रुपये आणण्याची मागणी करून सासरची मंडळी छळत होती, हे सांगताना तिने नणंदेच्या विचित्र कृत्‍याचीही माहिती दिली. २२ वर्षीय नणंद विचित्र स्वभावाची असून ती कधीही माझ्या पतीला येता जाता मिठी मारायची. आम्ही पती-पत्‍नी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : २५ वर्षीय विवाहितेने पती व सासरच्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार करताना धक्कादायक खुलासा केला आहे. फ्‍लॅट घेण्यासाठी माहेरावरून १५ लाख रुपये आणण्याची मागणी करून सासरची मंडळी छळत होती, हे सांगताना तिने नणंदेच्या विचित्र कृत्‍याचीही माहिती दिली. २२ वर्षीय नणंद विचित्र स्वभावाची असून ती कधीही माझ्या पतीला येता जाता मिठी मारायची. आम्ही पती-पत्‍नी एकांतात बेडवर असताना दोघांच्या मध्ये येऊन झोपायची. दोघे रात्र-रात्र गप्पा मारायचे, असे तक्रारीत म्‍हटले आहे.

सध्या विवाहिता चिकलठाणा परिसरातील सावित्रीनगरात माहेरी राहते. तिचे सासर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आहे. तक्रारीनुसार, तिचे लग्न १५ जून २०२३ रोजी झाले. लग्नानंतर आठ-दहा दिवस सासरच्यांनी चांगली वागणूक दिली. त्यानंतर पती, सासू, सासरे व नणंदेने फ्लॅट घेण्यासाठी १५ लाख रुपये माहेरावरून आणण्याची मागणी करून त्रास देण्यास सुरुवात केली. दिवसभर घरातील कामे मोलकरणीसारखे करण्यास भाग पाडत असत.

२२ वर्षीय नणंद विचित्र स्वभावाची असून ती पतीला कधीही येता जाता मिठी मारत असे. पती-पत्‍नी दोघेही बेडवर असताना दोघांच्या मध्ये येऊन झोपायची. पती व नणंद रात्र रात्र गप्पा मारत बसायचे. पतीसोबत संसार करण्याची इच्छा असल्याने याकडे दुर्लक्ष केल्याचे विवाहितेने म्‍हटले आहे. पोलिसांनी पती, सासू, सासरे, नणंद अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार बापूराव बावस्कर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software