१४ वर्षीय अनुष्काच्या संशयास्पद मृत्‍यूच्या घेऱ्यात गिरी कुटुंबातील तिघे!; एकूणच वर्तन शंका उपस्थित करणारे, वाळूज MIDC तील तिसगावची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : तिसगाव येथील १४ वर्षीय अनुष्का पांडुरंग पदमाने या मुलीच्या संशयास्पद मृत्‍यूप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी (५ ऑगस्ट) शेजारी राहणाऱ्या गिरी कुटुंबातील समाधान गिरी, त्याची पत्नी शिवानी गिरी व बहीण सरला गिरी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. २५ जूनला अनुष्काचा मृत्‍यू झाल्यानंतर रहिवाशी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आक्रमक झाले होते. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : तिसगाव येथील १४ वर्षीय अनुष्का पांडुरंग पदमाने या मुलीच्या संशयास्पद मृत्‍यूप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी (५ ऑगस्ट) शेजारी राहणाऱ्या गिरी कुटुंबातील समाधान गिरी, त्याची पत्नी शिवानी गिरी व बहीण सरला गिरी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. २५ जूनला अनुष्काचा मृत्‍यू झाल्यानंतर रहिवाशी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आक्रमक झाले होते.

पांडुरंग नागोराव पदमाने हे पत्नी रेखा, मुलगी अनुष्का व मुलगा सक्षम यांच्यासह तिसगावच्या भारतनगरात राहतात. अनुष्का एका खासगी शाळेत नववीत शिकत होती. २५ जूनला पांडुरंग पदमाने व त्यांची पत्नी रेखा कंपनीत कामाला गेले होते. अनुष्का व तिचा भाऊ सक्षम दोघेच घरीच होते. सायंकाळी साडेचारला कंपनीतून सुटी झाल्यानंतर पांडुरंग पदमाने हे मित्र उद्धव धिरडे यांच्यासोबत चहा घेण्यासाठी जात असताना त्यांना कुणाचातरी कॉल आला. आवाज स्पष्ट येत नसल्याने पांडुरंग पदमाने मित्रासह घरी आले. त्यांना मुलगी अनुष्का जमिनीवर तर मुलगा सक्षम सोफ्यावर झोपलेला दिसला. पांडुरंग पदमाने यांनी मुलगा सक्षमला मला कुणी फोन केला, अशी विचारणा केली असता त्याने अनुष्काने फोन केला असावा, असे सांगितले.

अनुष्का झोपेतून उठलीच नाही…
पांडुरंग यांनी अनुष्काला झोपेतून उठविण्याचा प्रयत्न केला असता ती उठली नाही. तिला शेजाऱ्यांच्या मदतीने बेशुद्धावस्थेत छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पांडुरंगसोबत असलेल्या समाधान गिरी याने आमचा तुमच्या हॉस्पिटल, डॉक्टरवर विश्वास नाही असे म्हणत अनुष्काला खासगी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनीही ती मृत झाल्याचे सांगितले. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अनुष्काचा उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. अनुष्काच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी तिचे वडील पांडूरंग पदमाने यांनी शेजारी समाधान गिरी, त्याची पत्नी शिवानी गिरी व बहीण सरला गिरी यांच्यावर संशय व्यक्त केला होता. तिघांनीच घराचे कुलूप तोडून पुरावे नष्ट केल्याने त्यांनीच अनुष्काचा गळा दाबून खून केल्याचे पोलिसांना सांगितले होते. अधिक तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे करत आहेत.

संशय का?
अनुष्काचा मृतदेह घाटीत आणल्यानंतर पांडुरंग पदमाने उत्तरीय तपासणीसाठी थांबले. यावेळी समाधान गिरी हा अनुष्काची आई रेखा व नातेवाइकांना पदमाने यांच्या घरी घेऊन आला. यानंतर समाधान गिरी याने रेखा पदमाने यांच्याकडे चावी न मागता त्यांच्या घराचे कुलूप तोडून पत्नी शिवानी गिरी व बहीण सरला गिरी यांच्या मदतीने घरातील सायकल, खुर्ची व इतर सामान बाहेर आणून टाकले होते. पोलीस पंचनाम्यासाठी घरी आले असता त्यांना घरात कुठलेही पुरावे दिसले नाहीत. त्यांनी पांडुरंग पदमाने यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी शेजाऱ्यांनी घरातील सामान बाहेर आणून टाकल्याची माहिती दिली होती. समाधान गिरीच्या पत्‍नी व बहिणीला पांडुरंग पदमाने यांच्या घरातील सामान बाहेर आणून टाकण्याची गरज काय आणि एकूणच घटनाक्रमातील समाधान गिरीची भूमिका संशयास्पद असल्याने त्‍यांनीच काहीतरी काळेबेरे केल्याचा संशय निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software