हॉटेलमध्ये जेवण करून घरी परतताना भरधाव वाहनाने दुचाकीला ठोकरले, पेट्रोलपंप कर्मचाऱ्याचा जागीच मृत्‍यू, छत्रपती संभाजीनगरची घटना, मित्र गंभीर जखमी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : हॉटेलमध्ये जेवण करून घरी निघालेल्या दोन मित्राच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने ठोकरले. यात २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्‍यू झाला, तर त्‍याचा मित्र तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (१९ जुलै) पहाटे दोनच्या सुमारास (मध्यरात्री) सावंगी बायपासवरील नारेगावजवळ (कचरा डेपोजवळ) घडला. रामेश्वर एकनाथ पाले (वय २५) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव असून, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : हॉटेलमध्ये जेवण करून घरी निघालेल्या दोन मित्राच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने ठोकरले. यात २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्‍यू झाला, तर त्‍याचा मित्र तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (१९ जुलै) पहाटे दोनच्या सुमारास (मध्यरात्री) सावंगी बायपासवरील नारेगावजवळ (कचरा डेपोजवळ) घडला.

रामेश्वर एकनाथ पाले (वय २५) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव असून, तो खुलताबाद तालुक्‍यातील बाजारसावंगीजवळील शेखपूरचा मूळचा आहे. ५ वर्षांपासून पिसादेवी भागात राहून तो पेट्रोलपंपावर नोकरी करत होता. विनोद तुळशीराम फटाकडे (वय २५, रा. शेखपूर) असे गंभीर जखमीचे नाव आहे. रामेश्वर गुरुवारी सुटी असल्याने गावी गेला होता. त्याला मित्र विनोद भेटला. रात्री दोघांनी हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर ते रूमला जाण्यासाठी दुचाकीने सावंगी बायपासने निघाले होते.

नारेगाव कचरा डेपोजवळ दोघांना अज्ञात वाहनाने समोरून धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी रामेश्वरला तपासून मृत घोषित केले. विनोदला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद सिडको एमआयडीसी पोलिसांनी केली आहे. रामेश्वरचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्याला एक लहान भाऊ आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने तो पेट्रोलपंपावर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!

Latest News

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ! State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...
State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!
कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software