वय १९ अन्‌ अट्टल दुचाकी चोर!; दरोड्यातही सहभाग असल्याचा पोलिसांना संशय!!; नीट मिसरूडही न फुटलेल्या तरुणाची कर्तबगारी…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : १९ वर्षांचा मुलगा जेव्हा अट्टल चोर असल्याचे पोलिसांच्या समोर आले तेव्हा त्यांनाही धक्काच बसला. नीट मिसरूडही न फुटलेल्या या मुलाने एक दोन नव्हे तर तब्बल ८ दुचाकी चोरल्याचे समोर आले. महिनाभरात त्याने सिडको, बेगमपुरा, गंगापूरमधून दुचाकी चोरून कलाग्राम परिसरातील झुडपे वाढलेल्या प्लॉटवर लपवल्या होत्या. आठही दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : १९ वर्षांचा मुलगा जेव्हा अट्टल चोर असल्याचे पोलिसांच्या समोर आले तेव्हा त्यांनाही धक्काच बसला. नीट मिसरूडही न फुटलेल्या या मुलाने एक दोन नव्हे तर तब्बल ८ दुचाकी चोरल्याचे समोर आले. महिनाभरात त्याने सिडको, बेगमपुरा, गंगापूरमधून दुचाकी चोरून कलाग्राम परिसरातील झुडपे वाढलेल्या प्लॉटवर लपवल्या होत्या. आठही दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत, असे सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी पत्रकारांना सांगितले.

रेहान ऊर्फ जादू खान अमजद खान (रा. नारेगाव) असे या अट्टल चोरट्याचे नाव आहे. पाच महिन्यांपूर्वीच त्याने वयाची १८ वर्षे पूर्ण केली अन् आता त्याची तुरुंगात रवानगी झाली. वैजापूरमध्ये दोन महिन्यांपूर्वी पडलेल्या दरोड्यातही त्याचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. रेहानला वेगवेगळ्या दुचाकींची हौस आहे. यातूनच तो गुन्हेगारीकडे वळला. प्रकाश रामभाऊ दानवे (वय ४४, रा. नारेगाव) यांची दुचाकी १४ सप्टेंबरला गरवारे परिसरातील महाविद्यालयासमोरून चोरीला गेली होती. सिडको एमआयडीसी पोलीस या घटनेचा तपास करत असताना चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत ही चोरीची दुचाकी विकण्यासाठी रेहान येत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक भारत पाचोळे यांना कळले. त्यांनी तातडीने पोलीस अंमलदार संजय नंद, संतोष सोनवणे, हैदर शेख, प्रकाश सोनवणे, संतोष गायकवाड, परशुराम सोनुने, अरविंद पुरी, वर्षा पवार यांच्यासह तीन मुख्य रस्त्यांवर सापळा रचला. रेहान चोरीच्या दुचाकीसह पकडला गेला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!

Latest News

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ! State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...
State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!
कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software