मागील चाक फुटून कार दुभाजकावर आदळली, तरुण बाहेर फेकला जाऊन मृत्‍यूमुखी, शेंद्रा येथील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव कारचे अचानक चाक फुटले. चालकाशेजारी बसलेला २४ वर्षीय तरुण कारबाहेर फेकला गेला. गंभीर जखमी होऊन उपचारादरम्‍यान त्‍याचा मृत्‍यू झाला. १६ सप्टेंबरला घटना घडली होती, गुरुवारी (१८ सप्टेंबर) त्‍याचा मृत्‍यू झाला. शेंद्रा परिसरातील आकाश ढाब्याजवळ हा अपघात घडला होता. आकाश किरण आढावे (वय २४, रा. भोकरदन जि. जालना) असे मृत्‍यू […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव कारचे अचानक चाक फुटले. चालकाशेजारी बसलेला २४ वर्षीय तरुण कारबाहेर फेकला गेला. गंभीर जखमी होऊन उपचारादरम्‍यान त्‍याचा मृत्‍यू झाला. १६ सप्टेंबरला घटना घडली होती, गुरुवारी (१८ सप्टेंबर) त्‍याचा मृत्‍यू झाला. शेंद्रा परिसरातील आकाश ढाब्याजवळ हा अपघात घडला होता.

आकाश किरण आढावे (वय २४, रा. भोकरदन जि. जालना) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. आकाश आणि प्रकाश मोरे हे दोघे मित्र कारने १६ सप्टेंबरला जालन्याला जात होते. शेंद्रा परिसरातील आकाश ढाब्याजवळ अचानक मागील चाक फुटले. कार नियंत्रण सुटून दुभाजकाला धडकली. कारचा वेग जास्त असल्याने धडकेत कारचा दरवाजा उघडला जाऊन चालक सीटच्या शेजारी असलेला आकाश बाहेर फेकला गेला. यात त्याच्या डोके, छातीला गंभीर मार लागला. त्याच्यावर घाटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. गुरुवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चिकलठाणा पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. गुलमंडी येथील एका हॉटेलचा व्यवस्थापक असलेला आकाश अविवाहित होता, तर प्रकाश चालक आहे. आकाशला दोन बहिणी असून त्याचे आई-वडील मजुरी करतात. घराची जबाबदारी त्याच्यावरच होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software