प्रदीपच्या हत्‍येनंतर स्‍नान केले, अस्ताव्यस्त गाद्या, बेटशीट नीट केले, कपडे धुतले, चाकू मित्राच्या खोलीवर नेऊन ठेवला… हा क्रूरकर्मा अल्पवयीन कसा म्हणायचा?

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : प्रदीपची हत्‍या केल्यानंतर अल्पवयीन मावसभावाचे कपडे रक्‍ताने माखले. त्‍याने स्नान केले. अस्ताव्यस्त गाद्या, बेडशीट नीट केल्या. रक्ताने माखलेले कपडे धुवून एका बॅगमध्ये ठेवत ती खोलीच्या माळ्यावर ठेवली. एका कापडात चाकू बांधून साताऱ्यातील मित्राच्या खोलीवर लपवून ठेवला… एखाद्या अट्टल गुन्हेगारालाही मागे टाकणारा हा क्रूर कारमाना करणारा आरोपी अल्पवयीन कसा असू शकतो, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : प्रदीपची हत्‍या केल्यानंतर अल्पवयीन मावसभावाचे कपडे रक्‍ताने माखले. त्‍याने स्नान केले. अस्ताव्यस्त गाद्या, बेडशीट नीट केल्या. रक्ताने माखलेले कपडे धुवून एका बॅगमध्ये ठेवत ती खोलीच्या माळ्यावर ठेवली. एका कापडात चाकू बांधून साताऱ्यातील मित्राच्या खोलीवर लपवून ठेवला… एखाद्या अट्टल गुन्हेगारालाही मागे टाकणारा हा क्रूर कारमाना करणारा आरोपी अल्पवयीन कसा असू शकतो, यावर सध्या खल होत आहे. यासाठी त्याच्या वयाची खात्री करण्यासाठी हाडांची तपासणी पोलीस करणार आहेत. अल्पवयीन आरोपीला प्रौढ समजण्यासाठी पोलीस न्यायालयातही अर्ज करणार आहेत.

पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी शनिवारी (१८ जानेवारी) अल्पवयीन आरोपीची चौकशी केल्यानंतर त्‍याने केलेल्या कौर्याचा घटनाक्रम समोर आला. सायंकाळी ५ वाजता त्याला बालन्याय मंडळाच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीच्या कुटुंबाने त्याच्या शाळेची कागदपत्रे सादर केल्यानंतर तो १७ वर्षे ६ महिन्यांचा असल्याचे समोर आले. तरीही त्याच्या वयाची निश्चित खात्री करण्यासाठी पोलीस हाडांची तपासणी करणार आहेत.

घटनेची पार्श्वभूमी…
बीसीएसचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी असलेल्या प्रदीप विश्वनाथ निपटे (वय १९, रा. म्हाडा कॉलनी, उस्मानपुरा, मूळ रा. पिंपरखेड, ता. वडवणी, जि. बीड) याची हत्‍या १४ जानेवारीला सायंकाळी त्‍याच्याच साडेसतरा वर्षीय मावसभावाने केली. ऑनलाइन गेममध्ये जिंकलेल्या १ लाखापैकी प्रदीपच्या खेळण्याने ६५ हजार रुपये गमवावे लागले. या रागातून चाकूने १७ वार करून निर्घृण हत्‍या केली. घटनेच्या ७२ तासांनी गुरुवारी (१६ जानेवारी) मध्यरात्री पोलीस खुनाचे गूढ उकलण्यात यशस्वी ठरले होते. प्रदीप निपटे देवगिरी कॉलेजमध्ये शिकत होता. उस्मानपुऱ्यातील म्हाडाच्या जुन्या अपार्टमेंटमध्ये तळमजल्यावरील फ्‍लॅटमध्ये तो अमर शिंदे, अर्जुन कवचट, अभिषेक लव्हाळे, महेश चव्हाण या रुम पार्टनरसोबत राहत होता. १४ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता त्‍याचे रूम पार्टनर बाहेर गेले होते. तेव्हा प्रदीप एकटाच घरात होता. मित्रांनी जाताना दरवाजा केवळ ओढून घेतला. प्रदीप झोपून मोबाइलवर रिल्स पाहात होता. तेव्हाच, त्‍याच्या लहान मावसभावाने (आरोपी अल्पवयीन असल्याने नाव प्रसिद्ध करता येत नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी.) परत येऊन प्रदीपवर चाकूचे १७ वार करून हत्या केली होती.

ऑनलाइन गेमच्या आहारी…
दोन्ही भाऊ ऑनलाइन गेमच्या आहारी गेलेले होते. ते एव्हिएटर हा ऑनलाइन स्पोर्ट गेम खेळायचे. विशेष म्‍हणजे, हा गेम १८+ लोकांसाठी बनवलेला आहे. तरीही अल्पवयीन मावसभाऊ खेळायचा आणि जिंकायचा. त्‍याच्याकडे साधा मोबाइल असल्याने तो प्रदीपच्याच मोबाइलवर गेम खेळत होता. त्‍याने १ लाख रुपये जिंकले होते. गेमच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होऊन बँक खात्यावर घेतले जातात. प्रदीपने मात्र या खेळाची लेव्हल पुढे खेळत ६५ हजार रुपये हरला. त्‍यामुळे अल्पवयीन मावसभावाचा पारा चढला. त्‍यांच्यात वाद झाला. त्‍यावर प्रदीपने त्याच्याच उसन्या पैशांची आठवण करून दिली आणि परतफेड करण्यास नकार दिला. ही बाब अल्पवयीन मावसभावाला महिनाभरापासून सलत होती. प्रदीपच्या वडिलांचा रूम पार्टनरपैकी कुणावर संशय नव्हता. नात्‍यातीलच मुले असल्याने त्‍यांनी कुणावर आरोपही केला नाही. मात्र ही हत्‍या प्रदीपच्याच लहान मावसभावाने कळल्यावर त्‍यांना धक्का बसून प्रकृती खालावली. त्‍यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. जंबियाने खून केल्याची कबुली अल्पवयीन आरोपीने दिली आहे. तो एनडीएची तयारी करत होता. प्रदीपशी त्‍याची जिवलग मैत्री होती, त्‍याची चौकशी होत असताना तो अगदीच शांत भासायचा. पोलिसांनी ताब्‍यात घेतल्यावरही त्‍याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे भाव नव्हते, हे विशेष.

महिनाभरापासून खुनाची तयारी…
या खुनाचा तपास करताना पोलिसांना अल्पवयीन मावसभावाच्या मोबाइलमध्ये प्रदीप आणि त्‍याच्यातील आर्थिक व्यवहार दिसले. त्यातच दोन वेळेस त्‍याच्या जबाबात तफावत आल्याने पोलिसांचा संशय बळावला होता. त्याला हाताच्या जखमेचे उत्तरही देता आले नाही. महिनाभरापासून तो खुनाची तयारी करत होता. पुरावे नष्ट कसे करावे याचा ऑनलाइन अभ्यासही करत होता. प्रदीपचे दोन दिवसांपूर्वी महाविद्यालयात वाद झाले होते. त्याचे कारण सांगून पोलीस चौकशीला फाटे फोडता येतील, हाही विचार त्‍याने केला. मंगळवारी दुपारी त्‍यांच्यात वाद होऊन प्रदीपने त्याच्या कानशिलात लगावली होती. त्‍यामुळे राग टोकाला गेला अन्‌ सायंकाळी प्रदीप पालथा झोपलेला असतानाच त्याने चाकूचे सपासप १७ वार केले. प्रदीपचा मोबाइल सोबत नेल्यानंतर त्‍याने तो नाल्यात फेकला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी : ६ लाखांचा गांजा साठा जप्त, तस्कराच्या मुसक्या आवळल्या, साथीदार फरारी

Latest News

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी : ६ लाखांचा गांजा साठा जप्त, तस्कराच्या मुसक्या आवळल्या, साथीदार फरारी सातारा पोलिसांची मोठी कामगिरी : ६ लाखांचा गांजा साठा जप्त, तस्कराच्या मुसक्या आवळल्या, साथीदार फरारी
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा गाव आणि पैठण तालुक्‍यातील गेवराई बुद्रूकमध्ये सातारा पोलिसांनी मोठी कारवाई करत...
तरुणीने दोन दिवसांपूर्वी मोबाइल घेतला, कामावरून घरी येताना दुचाकीस्वाराने हिसकावून ठोकली धूम!, एएस क्लबजवळील घटना
महत्त्वाची बातमी : छ. संभाजीनगरात ‘म्हाडा’ सोडत अर्ज भरण्यास ८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
छ. संभाजीनगर जिल्ह्यातील शाळांत आता रोज एक तास खेळासाठी; जिल्हाधिकारी स्वामी यांची घोषणा
शेजाऱ्याच्या छतावर बसवलेल्या मोबाईल टॉवरमुळे तुमचे आरोग्य धोक्यात! रेडिएशन किती?, कुठे कराल तक्रार?
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software