पिल्लू पिल्लू… कोण म्हणतंय पाहण्यासाठी ती घराबाहेर आली अन्‌ पुढे जे घडलं ते धक्कादायकच होतं… हनुमाननगरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चोरट्यांनी आता मंगळसूत्र चोरीसाठी वेगळाच फंडा अवलंबला आहे. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील हनुमाननगरात चोरट्यांनी पिल्लू पिल्लू म्‍हणत महिलेला आधी आवाज दिला. ती घराबाहेर येताच मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. ही घटना बुधवारी (१९ फेब्रुवारी) रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली. ४३ वर्षीय महिलेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, ती पती व मुलासह […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चोरट्यांनी आता मंगळसूत्र चोरीसाठी वेगळाच फंडा अवलंबला आहे. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील हनुमाननगरात चोरट्यांनी पिल्लू पिल्लू म्‍हणत महिलेला आधी आवाज दिला. ती घराबाहेर येताच मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. ही घटना बुधवारी (१९ फेब्रुवारी) रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली.

४३ वर्षीय महिलेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, ती पती व मुलासह राहते. बुधवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास घरी एकटीच पाणी भरत असताना एक अनोळखी ज्याचे वय २४ ते २५ असेल, सावळ्या रंगाचा, पांढरी शेरवानी, काळे बूट घातलेला, सडपातळ असा मुलगा त्‍यांच्या घराबाहेर येऊन पिल्लू पिल्लू आवाज देऊ लागला. असं कोण आवाज देतंय, हे पाहण्यासाठी महिला घराबाहेर आली व त्याला कोण पाहिजे, अशी विचारणा केली असता त्‍याने महिलेच्या पोटात लाथ मारून त्‍यांच्या गळ्यातील सोन्याचे मनीमंगळसूत्र ओढून तोडले.

ओढताना महिलेने त्याचा हात धरला असता त्याने हाताला झटका दिला व लोटून दिले. बाहेर उभ्या असलेल्या गाडीवर बसून पळून गेला. त्याच्यासोबत आणखी एक मुलगा होता. महिलेने आरडाओरड केल्याने गल्लीतील लोक जमा झाले. त्यातील शेजारील एका व्यक्‍तीने तो कुल्या उर्फ कृष्णा साळुंके व त्याच्यासोबत गाडीवर त्याचा भाऊ असल्याचे सांगितले आहे. महिलेने पुंडलिकनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. २७ हजार रुपयांचे ८ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र त्‍याने हिसकावून नेल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. त्‍यावरून पोलिसांनी कृष्णा साळुंके व त्‍याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन राऊत करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software