ड्रोनद्वारे बिबी का मकबरा, सोनेरी महलचे शूटिंग महागात पडले!; ३ रीलस्टारविरुद्ध गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरात ड्रोन उडविण्यासाठी कायदेशीर परवानगी लागते. तरीही बिबी का मकबरा आणि सोनेरी महल या प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोनद्वारे चित्रिकरण करणाऱ्या ३ रीलस्टारविरुद्ध शहर पोलिसांच्या सायबर विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस अंमलदार गोकूळ कुतरवाडे यांच्या तक्रारीवरून महम्मद इकरामोद्दीन महम्मद मुस्तफा शरीफ (वय २९, रा. बारुदनगर नाला, औरंगपुरा), तर पोलीस अंमलदार […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरात ड्रोन उडविण्यासाठी कायदेशीर परवानगी लागते. तरीही बिबी का मकबरा आणि सोनेरी महल या प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोनद्वारे चित्रिकरण करणाऱ्या ३ रीलस्टारविरुद्ध शहर पोलिसांच्या सायबर विभागाने गुन्हे दाखल केले आहेत.

पोलीस अंमलदार गोकूळ कुतरवाडे यांच्या तक्रारीवरून महम्मद इकरामोद्दीन महम्मद मुस्तफा शरीफ (वय २९, रा. बारुदनगर नाला, औरंगपुरा), तर पोलीस अंमलदार राहुल काळे यांच्या तक्रारीवरून मोहम्‍मद मोईनोद्दीन मोहम्‍मद इरफान (वय १८, रा. यशोधरा कॉलनी, एन ८ सिडको फतेसिंगपुरा), शेख मुदस्सीर शेख रज्‍जाक (रा. बेगमपुरा) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्‍यांनी ड्रोन उडविण्यासाठी परवानगी घेतली नाही. ज्‍या ठिकाणी ड्रोन उडवले ते क्षेत्र प्रतिबंधित केलेले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software