टवाळखोरांनी हद्द केली… २० वर्षीय तरुणी बहिणीसोबत जात असताना वाचा काय केले…, तुळजाभवानी शाळेजवळील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : २० वर्षीय विवाहित तरुणी छोट्या बहिणीसोबत आईच्या घरी जात असताना रस्त्यात टवाळखोरांनी शिवीगाळ करत त्रास द्यायला सुरुवात केली. याबद्दल तरुणीने पतीला कळवल्यानंतर तिच्या पतीने तिथे येत टवाळखोरांना जाब विचारला असता टवाळखोरांनी पती- पत्‍नीला मारहाण केली. यात दाम्‍पत्‍य जखमी झाले. ही खळबळजनक घटना मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुकुंदनगर येथील तुळजाभवानी शाळेजवळ […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : २० वर्षीय विवाहित तरुणी छोट्या बहिणीसोबत आईच्या घरी जात असताना रस्त्यात टवाळखोरांनी शिवीगाळ करत त्रास द्यायला सुरुवात केली. याबद्दल तरुणीने पतीला कळवल्यानंतर तिच्या पतीने तिथे येत टवाळखोरांना जाब विचारला असता टवाळखोरांनी पती- पत्‍नीला मारहाण केली. यात दाम्‍पत्‍य जखमी झाले. ही खळबळजनक घटना मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुकुंदनगर येथील तुळजाभवानी शाळेजवळ ३० जुलैला सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या प्रकरणात बुधवारी (७ ऑगस्ट) मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी रोहित म्‍हस्‍के व त्‍याचे दोन मित्र (रा. मुकुंदवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

२० वर्षीय तरुणी पतीसह मुकुंदनगरातील तुळजाभवानी शाळेजवळ राहते. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू असताना मुकुंदवाडी पोलिसांनी जबाब नोंदवला. त्‍यानुसार ती फार्मसीचे शिक्षण घेते. ३० जुलैला संध्याकाळी पतीसोबत भांडण ती आईच्या घरी प्रकाशनगर येथे जाण्यासाठी छोट्या बहिणीसोबत निघाली. तुळजाभवानी शाळेजवळ रोहित म्हस्के व त्याचे दोन मित्र बसलेले होते. त्‍यांनी तरुणी व तिच्या बहिणीला शिवीगाळ सुरू केली. त्‍यामुळे तरुणीने पतीला कॉल करून बोलावून घेतले. तिथे तिचा पती आला त्याच्यासोबत टवाळखोरांनी वाद घालून रोहित म्हस्केने दगडाने तरुणीच्या डोक्यात मारले. त्‍यामुळे ती जखमी झाली. रोहितच्‍या दोन मित्रांनी तरुणी व तिच्या पतीला लाथाबुक्‍क्यांनी मारहाण केली. तपास पोलीस अंमलदार प्रकाश जाधव करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software