छत्रपती संभाजीनगरात आणखी एक मोठा घोटाळा : आत्‍महत्‍या प्रकरणातील संशयित निघाला महाठग!; मनोजराजे भोसलेने १९०० ठेवीदारांना १०० कोटींना गंडवले?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महिन्याकाठी १५ टक्के परताव्याचे आमिष दाखवून मनोजराजे विष्णू भोसले (वय ३५, रा. माउलीनगर, बीड बायपास) या ठगाने तब्बल १९०० ठेवीदारांना १०० कोटींचा गंडा घातल्याचे समोर आल्याने छत्रपती संभाजीनगरात खळबळ उडाली आहे. संतप्त ठेवीदारांनी सोमवारी (१२ ऑगस्ट) पोलीस आयुक्तालयात धाव घेऊन तक्रार केल्यानंतर आदर्श, अजिंठा पतसंस्थेनंतरचा हा मोठा घोटाळा समोर आला […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महिन्याकाठी १५ टक्के परताव्याचे आमिष दाखवून मनोजराजे विष्णू भोसले (वय ३५, रा. माउलीनगर, बीड बायपास) या ठगाने तब्बल १९०० ठेवीदारांना १०० कोटींचा गंडा घातल्याचे समोर आल्याने छत्रपती संभाजीनगरात खळबळ उडाली आहे. संतप्त ठेवीदारांनी सोमवारी (१२ ऑगस्ट) पोलीस आयुक्तालयात धाव घेऊन तक्रार केल्यानंतर आदर्श, अजिंठा पतसंस्थेनंतरचा हा मोठा घोटाळा समोर आला आहे.

काय आहे भानगड…
२०२१ मध्ये मनोजराजेने एस. एम. ग्रोथ नावाने कंपनी स्थापन केली. शेअर मार्केट ट्रेडिंगची कंपनी असल्याचा दावा करून त्याने अनेकांना १०, १५, २० महिन्यांसाठी गुंतवणूक करण्यास सांगून १५ टक्के परताव्याचे आमिष दाखवले. उल्कानगरीमधील खिंवसरा पार्कमध्ये त्याचे कार्यालय होते. त्याने आलिशान गाड्यादेखील खरेदी करण्यास सुरुवात केली होती. त्‍याने डिसेंबर २०२३ पर्यंत काही ठेवीदारांना परतावाही दिला. मात्र नंतर ऑडिटचे कारण देऊन पैसे देणे बंद केले. मार्चमध्ये तो चक्क पसार झाला. त्याने खिंवसरामधील कार्यालयदेखील बंद केले. सध्या तिथे गाळा भाड्याने देण्याचा बोर्ड लागलेला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ठेवीदारांना मंगळवारी सर्व माहिती घेऊन हजर राहण्यास सांगितले आहे. त्‍यातून घोटाळ्याचा नक्की आकडा मिळण्यास मदत होणार आहे.

भागीदाराच्या आत्‍महत्‍येनंतर बिंग फुटले…
छत्रपती संभाजीनगर शहरासह वसमत येथील जवळपास २ हजार ठेवीदारांना १०० कोटी रुपयांना गंडा मनोजराजेने घातल्याचे समोर येत आहे. मनोजचे आई-वडील शिक्षक असून कन्नडमधील प्राध्यापक कॉलनीत त्याचे कुटुंब राहते. ठेवीदारांनी खिंवसरामधील कार्यालयासह त्‍याचे घर गाठले. पण तो पसार झाला आहे. मनोजने गारखेड्यातील सुनील उगलमुगले यांच्यासोबत भागीदारीत कंपनी सुरू केली होती. मात्र, मनोजने फसवल्याच्या तणावातून सुनीलने २० फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. त्‍याच्या आत्‍महत्‍येप्रकरणी सुनीलची पत्नी सुकन्या यांच्या तक्रारीवरून मनोजसह सोनम भल्ला, नरेश भल्ला यांच्याविरुद्ध मार्चमध्ये पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!

Latest News

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली! ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मधील रहिवासी अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून...
एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  
जाधववाडीत २३ वर्षीय तरुणाची आत्‍महत्‍या, प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल : पोलीस सूत्र
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software