घाटीच्या डेंटल विभागातून अल्पवयीन मुलीचे अपहरण!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) डेंटल रुग्णालयातून १५ वर्षीय मुलीचे अपहण करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मुलगी २९ जूनला दुपारी १ च्या सुमारास आजोबासोबत उपचारासाठी घाटीत आली होती. आजोबा दुकानातून तिला दहावीची पुस्तके घेऊन येईपर्यंत ती गायब झाली. मुलगी डोंगरगाव (पो. अन्वी,ता. सिल्लोड) येथील आहे. मुलगी दहावीत शिकते. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) डेंटल रुग्णालयातून १५ वर्षीय मुलीचे अपहण करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मुलगी २९ जूनला दुपारी १ च्या सुमारास आजोबासोबत उपचारासाठी घाटीत आली होती. आजोबा दुकानातून तिला दहावीची पुस्तके घेऊन येईपर्यंत ती गायब झाली. मुलगी डोंगरगाव (पो. अन्वी,ता. सिल्लोड) येथील आहे.

मुलगी दहावीत शिकते. ती आजोबासोबत उपचार घेण्यासाठी घाटीच्या डेंटल रुग्णालयात आली होती. तिचा नंबर येण्यास उशिर असल्याने आजोबानी तिला रांगेत नंबरसाठी उभे केले. तिला म्हणाले, की मी दुकानातून तुझे दहावीची पुस्तके घेऊन येतो, तोपर्यंत तू इथेच नंबरला थांब. नंतर दुपारी साडेचारला मुलीने वडिलांना कॉल करून आईला अजून माझा नंबर आला नाही. मी इथेच थांबून आहे, असे सांगितले.

त्यानंतर ४ वाजून ५० मिनिटांनी तिचे आजोबा पुस्तक घेऊन घाटीत आले असता मुलगी दिसून आली नाही. त्‍यांनी डॉक्टरांना विचारपूस केली असता ते म्हणाले, की ती अर्ध्या तासापूर्वीच निघून गेली आहे. आजोबांनी आजूबाजूला तिचा शोध घेतला ती दिसून आली नाही. ते परत डोंगरगावला आले. त्‍यानंतर मुलीच्या वडिलांनी छत्रपती संभाजीनगरला येऊन बेगमपुरा पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार नोंदवली. मुलीच्या अंगात फिकट गुलाबी कलरचा टॉप, फिकट गुलाबी कलर पायजामा, बुरखा ग्रे कलरचा होता. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळेकर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software