खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांचा प्रवाशी वाहतुकीच्या आड ड्रग्‍ज तस्करीचा धंदा!; सना ट्रॅव्हल्सचे कर्मचारी पकडले, नामांकित ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्‍याही सहभागाची शक्‍यता

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी प्रवाशी वाहतुकीआड ड्रग्‍ज तस्करीचा धंदा सुरू केल्याचे शनिवारच्या कारवाईतून समोर आले आहे. सना ट्रॅव्हलची राजवीर (एनएल ०१ बी १९०६) नावाच्या बसवर कारवाईनंतर आता शहरातील सर्वच खासगी ट्रॅव्हल्सची नियमित तपासणी गरजेची होऊन बसली आहे. नामांकीत ट्रॅव्हल्स कंपन्यांचे कर्मचारी तस्करीत गुंतले असल्याची कबुली पकडलेल्या ड्रग्‍जतस्करांनी दिल्याने या प्रकरणाचे गांभीर्य […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी प्रवाशी वाहतुकीआड ड्रग्‍ज तस्करीचा धंदा सुरू केल्याचे शनिवारच्या कारवाईतून समोर आले आहे. सना ट्रॅव्हलची राजवीर (एनएल ०१ बी १९०६) नावाच्या बसवर कारवाईनंतर आता शहरातील सर्वच खासगी ट्रॅव्हल्सची नियमित तपासणी गरजेची होऊन बसली आहे. नामांकीत ट्रॅव्हल्स कंपन्यांचे कर्मचारी तस्करीत गुंतले असल्याची कबुली पकडलेल्या ड्रग्‍जतस्करांनी दिल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

पेडलर सिकंदर खाजा शेख (वय ३२, रा. पटेलनगर, छत्रपती संभाजीनगर), ट्रॅव्हल बसचालक शब्बीर शेख शफी शेख (४२, रा. जालना) व क्लीनर अफरोज खान निजाम खान (२६, रा. कटकट गेट, छत्रपती संभाजीनगर) अशी पोलिसांनी ताब्‍यात घेतलेल्यांची नावे आहेत. शनिवारी (१० ऑगस्ट) पहाटे चारला एनडीपीएस पथकाने मुंबई-छत्रपती संभाजीनगर मार्गावर धावणारी सना ट्रॅव्हल्सची राजवीर ही बस पकडून ड्रग्‍ज रॅकेट उघडकीस आणले. पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांना शहरात नशेच्या गोळ्यांसह पावडरसदृश एमडी ड्रग्स मुंबईच्या ट्रॅव्हल्समधून येत असल्याची माहिती मिळाली होती.

पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या सूचनेवरून त्यांनी पथकासह पंचवटी कॉर्नर परिसरात सापळा रचला. पहाटे चारला बस येताच ड्रग्‍ज पेडलर सिकंदर चालकाच्या खिडकीजवळ पोहोचताच पोलिसांनी कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, अंमलदार लाल खान पठाण, सतीश जाधव यांनी सिकंदरच्या मुसक्या आवळल्या, तर पोलीस अंमलदार संदीपान धर्मे, महेश उगले, विजय त्रिभुवन, ऋषिकेश शेळके, छाया लांडगे यांनी चालक व क्लीनरला ताब्यात घेतले.

चालक शब्बीरने सिकंदरच्या हाती दिलेल्या दोन मिठाईच्या बॉक्समध्ये ५.७ ग्रॅम एमडी ड्रग्ज व १०३ नशेच्या गोळ्या आढळल्या. बेगमपुऱ्यातील अझहरने सिकंदरला हे काम सांगितले होते. मुंबईहून नगमा शेख बाजी ही महिला छत्रपती संभाजीनगरात ड्रग्ज पाठवते. सिकंदर, शब्बीरने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अनेक नामांकीत ट्रॅव्हल्स कंपनीचे कर्मचारी, चालक, क्लिनर या रॅकेटमध्ये सहभागी आहेत. त्‍यामुळे आता सर्वच ट्रॅव्हल्स नियमित झडती घेण्याची गरज व्यक्‍त केली जात आहे.

कुठे होतो ड्रग्‍ज पुरवठा?
छत्रपती संभाजीनगर शहरातील महाविद्यालये, मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह तरुण-तरुणींना ड्रग्‍जचा पुरवठा केला जातो. मुंबईहून प्रवासी बॅग, मिठाईच्या बॉक्समधून ड्रग्ज आणले जाते. शहरातील तरुणाईला ड्रग्‍जचा कसा विळखा पडला आहे, याचे भयंकर चित्र या कारवाईतून समोर आले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software