औषध विक्रेत्‍याने मेडिकलमध्येच घेतला गळफास; रांजणगाव शेणपुंजीतील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ४८ वर्षीय औषध विक्रेता विजय नारायण पटेल (रा. बजाजनगर) यांनी स्वतःच्या दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (११ जुलै) सायंकाळी रांजणगाव शेणपुंजीत समोर आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. विजय पटेल हे तुर्काबाद खराडी (ता. गंगापूर) येथील असून, सध्या रांजणगाव शेणपुंजीत पत्‍नी, मुलगा व मुलीसह राहतात. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ४८ वर्षीय औषध विक्रेता विजय नारायण पटेल (रा. बजाजनगर) यांनी स्वतःच्या दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (११ जुलै) सायंकाळी रांजणगाव शेणपुंजीत समोर आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.

विजय पटेल हे तुर्काबाद खराडी (ता. गंगापूर) येथील असून, सध्या रांजणगाव शेणपुंजीत पत्‍नी, मुलगा व मुलीसह राहतात. गुरुवारी ते दुकानात होते. सायंकाळी मेडिकल स्टोअर्सचे शटर अर्धवट लावलेले दिसल्याने शेजारीच मोबाइल शॉपीचे दुकान असणारे त्यांचे चुलत भाऊ अंबालाल पटेल यांनी आत डोकावले. त्‍यांना विजय यांनी सिलिंग फॅनला बेडशीटच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसले.

त्‍यांनी आरडाओरड केली असता लगतचे व्यावसायिक धावून आले. त्‍यांनी विजय यांना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्‍थळी येत पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर शुक्रवारी विजय यांच्यावर तुर्काबाद खराडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची नोंद वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घेतली असून, अधिक तपास पोलीस अंमलदार सुरेश तारव करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!!

Latest News

शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!! शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बेगमपुरा पोलीस ठाण्याचा पोलीस अंमलदार गणेश गायकवाड याने वरिष्ठांच्या नावे तब्बल १४ लाख रुपयांची...
आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक, नोकरी मागण्यासाठी आला होता...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software